Myanmar Earthquake : म्यानमार पुन्हा भूकंपाने हादरलं; आतापर्यंत १००० हून अधिक जणांचा मृत्यू, २३७६ जखमी

Myanmar Earthquake update : म्यानमार पुन्हा भूकंपाने हादरलंय. या भूकंपात आतापर्यंत १००० हून जणांचा मृत्यू झाला आहे. तर २००० अधिक जण जखमी झाले आहेत.
Myanmar
Myanmar Earthquake Saam tv
Published On

म्यानमार देश पुन्हा भूकंपाने हादरला आहे. म्यानमार आणि थायलंड भूकंपामुळे उद्धवस्त झालं आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११.५६ वाजता भूकंपाचा धक्का ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्राच्या माहितीनुसार, नव्या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर खोलवर होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे आतापर्यंत १००२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २३७६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Myanmar
Ladki Bahin Yojana : आयकर विभागाचा आळस, अर्ज पडताळणी रखडली; लाडकी बहिणींचं फावलं

अफगाणिस्तानलाही भूकंपाचा हादरा

अफगाणिस्तानमध्ये शनिवारी सकाळी ५.१६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर (Richter Scale) याची तीव्रता ४.२ इतकी मोजली गेली. अफगाणिस्तानातील भूकंपामुळे कोणतीही वित्त आणि जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. म्यानमार आणि थायलंडमधील शक्तिशाली भूकंपानंतर अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला. म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बौद्ध विहार, रस्ते, ब्रिज उद्धस्त झाले आहेत.

Myanmar
Eknath Shinde Song : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...; कामराला शिंदे गटाचा जबरा उत्तर, उद्धव ठाकरेंवरही बाण, VIDEO

म्यानमार आणि थायंलडमध्ये अनुक्रमे ७.७ आणि ७.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपात इमारती, बौद्ध स्तुप, रस्ते उद्धस्त झाले आहेत. दोन्ही देशातील व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये कमीत कमी १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बँकॉकमधील एक गगनचुंबी इमारत काही सेकंदात कोसळली. म्यानमार हा गरीब देशांपैकी एक आहे. म्यानमार हा देश सध्या गृहयुद्धात अडकला आहे. देशावर सैन्याची सत्ता असल्याने कडक निर्बंध आहेत.

Myanmar
Shocking News : वंशाच्या दिव्यासाठी बाप झाला हैवान; ५ महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून ठार मारलं

दरम्यान, भारताने म्यानमारमध्ये १५ टन साहित्य मदत म्हणून पाठवलं आहे. भारतीय हवाई दलाचं सी-१३० जे सुपर हरक्यूलिस विमान हिंडन एअरफोर्स स्टेशनहून साहित्य घेऊन म्यानमारला रवाना झालं आहे. भारताने मदत म्हणून तंबू, अंथरुण, चादर, जेवण, वॉटर प्यूरिफायर, सॅनिटेशन किट, औषधे इत्यादी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. दुसरीकडे संयुक्त राष्ट्राने बचाव कार्यासाठी ५ मिलियन डॉलर दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com