satsang vihar Badlapur Latest news Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur : बदलापुरात प्रशासनाची मोठी कारवाई; अतिक्रमणाचा डाव हाणून पाडला, संस्थेला धाडली 10,00,00,000 रुपयांची नोटीस

satsang vihar Badlapur Latest news : बदलापुरात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. प्रशासनाने एका संस्थेचा अतिक्रमणाचा डाव हाणून पाडला. त्यानंतर त्यांना नोटीस धाडली.

Vishal Gangurde

मयुरेश कडव, साम टीव्ही

Badlapur News : उल्हास नदीत बेकायदा भराव टाकणं बदलापूरच्या सत्संग विहार प्रशासनाच्या अंगलट आल आहे. तहसीलदारांनी सत्संग विहारला 10 कोटी 17 लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. 7 दिवसात दंड न भरल्यास सत्संग विहार प्रशासनावर कडक कारवाई केली जाणार आहे.

बदलापूर पश्चिमेकडील हेंद्रेपाड्यात सत्संग विहार असून अनेक भाविक येथे येत असतात. काही दिवसांपूर्वी सत्संग विहारच्या व्यवस्थापनामार्फत उल्हास नदी पात्रात बेकायदा मातीचा भराव टाकून थेट नदीतच अतिक्रमण केलं होतं. त्यामुळे हेंद्रेपाडा, गणेश नगर, रमेशवाडी, बॅरेज रोड या भागात पुराचा धोका वाढला होता.

याविषयीची तक्रार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्यांनी यंत्रसामुग्री जप्त करून काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महसूल विभागाने कठोर पावलं उचलत सत्संग व्यवस्थापनाला 10 कोटी 17 लाख रुपये दंडाची नोटीस बजावलीय. त्यामुळे सत्संग व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत.

दंडाची रक्कम भरण्यासाठी सत्संग विहार प्रशासनाला सात दिवसांची मुदत देण्यात आलीय. मुदतीत दंड न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदीनुसार दंडाची रक्कम सक्तीने वसूल केली जाणार आहे.

बदलापुरातील चौक घेणार आता मोकळा श्वास

बदलापूर नगरपालिकेचे प्रशासक मारूती गायकवाड यांनी शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतलीय. शहरातील अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई केल्यानंतर पालिकेनं आता मोर्चा शहरातील मुख्य चौकांकडे वळवलाय. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं आज कात्रप, मॅकडोनल्ड चौकातील अतिक्रमणं हटवली. या कारवाईमुळे आता बदलापुरातील मुख्य चौक मोकळा श्वास घेणार आहेत. या कारवाईवेळी पोलिसांचा तसेच पालिकेतील सुरक्षारक्षकांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT