.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवीन आर्थिक वर्षात आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सुरुवात झाली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी फॉर्म १६ देखील जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया अगदी सोपी होणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आयटीआर फाइल करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय, जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केला नाही तर काय होणार याबाबत सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय?
ज्या करदात्यांचे ऑडिट होत नाही. त्यांच्यासाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. काही वेळेला परिस्थितीनुसार, आयटीआर फाइल करण्याची मुदत वाढवली जाते. त्यामुळे तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर भरणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.
जर मुदतीपूर्वी आयटीआर भरला नाही तर काय होणार?
जर तुम्ही आयटीआर उशिरा भरला तर तुम्हाला लेट फायलिंग करण्यासाठी व्याज आणि दंड भरावा लागणार आहे.
१ टक्के महिन्याला व्याज आणि टॅक्सचे पैसे भरावे लागणार आहे.
जर तुमचा इन्कम ५ लाखांपेक्षा कमी असेल तर त्यावर लेट फायलिंगचा दंड १००० रुपये आहे.
जर तुमचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ३१ डिसेंबरच्या आधी तुम्ही आयटीआर फाइल केला तर ५००० रुपये दंड भरावा लागेल.
जर तुम्ही आयटीआर वेळेवर भरत नसाल तर बिझनेस किंवा कॅपिटल गेनवर नुकसान होऊ शकते.
आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख
आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे.ज्या टॅक्सपेयर्सचे किंवा प्रोफेशनल अकाउंटचे ऑडिट होते. त्यांची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. प्रत्येक उत्पन्न गटासाठी वेगवेगळा आयटीआर फॉर्म असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.