Income Tax: नवीन की जुना,तुमच्यासाठी योग्य टॅक्स स्लॅब कोणता? जास्त सूट कुठे मिळेल? चेक करा डिटेल्स

Old Income Tax Regime VS New Tax Regime: करदाते आता आयटीआर फाइल करण्याची वाट बघत आहेत. दरम्यान, करदात्यांसाठी नवीन करप्रणाली की जुनी करप्रणाली चांगली आहे ते जाणून घ्या.
Income Tax
Income TaxSaam Tv
Published On

नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वजण आयटीआर फाइल करतात. आयटीआर फाइल करताना तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार फॉर्म निवडायचा असतो. याचसोबत तुम्हाला नवीन करप्रणाली किंवा जुनी करप्रणाली निवडायची हे तुमच्यावर अवलंबून असते.

तुमच्या उत्पन्नानुसार तुम्ही जुनी किंवा नवी करप्रणाली निवडू शकतात. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Income Tax
Tax Saving Tips: टॅक्स वाचवण्यासाठी उरले फक्त १० दिवस; ३१ तारखेपर्यंत या ठिकाणी करा गुंतवणूक, जाणून घ्या सविस्तर

नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना कमी टॅक्स भरावा लागणार आहे. बजेट २०२५ मधील नियमांनुसार, जर तुमचे वार्षिक उत्पन्न २४ लाख असेल तर तुम्हाला ३० टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. जर तुमचे उत्पन्न २० ते २४ लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला २५ टक्के टॅक्स भरावा लागणार आहे.

जर तुमचे उत्पन्न १६ ते २० लाख असेल तर २० टक्के टॅक्स, १२ ते १६ लाख उत्पन्न असेल तर १५ टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. ८ ते १२ लाख उत्पन्न असल्यावर १० टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये १० लाखांच्या उत्पन्नावर ३० टक्के कर द्यावा लागायचा. जुन्या कर प्रणालीपेक्षा नवीन करप्रणाली ही फायद्याची आहे.

१२.७५ लाखांवर टॅक्स नाही

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात नवीन करप्रणालीची घोषणा केली. यातमध्ये १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. यामुळे जर तुमचे १२ लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर तुम्हाला ८०,००० रुपयांचा फायदा होणार आहे. सध्या तुम्हाला यावर टॅक्स भरावा लागतो. १८ लाख उत्पन्न असल्यावर ७०,००० रुपये तर २५ लाख उत्पन्न असल्यावर १,१०,००० रुपयांचा फायदा होणार आहे.

Income Tax
Income Tax डिपार्टमेंटनं करदात्यासाठी दिली आनंदाची बातमी; घरी बसून भरता येणार इनकम टॅक्स

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २०२४-२५ मध्ये ७२ टक्के लोकांनी नवीन टॅक्स प्रणाली निवडली होती. दरम्यान, आता १२ लाखांवर कोणताही कर नसल्याने ९० टक्के लोक नवीन टॅक्स प्रणाली निवडतील, असं सांगण्यात येत आहे.

नवीन कर प्रणालीत स्टँडर्ड टॅक्स डिडक्शनची मर्यादादेखील वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा ५०,००० रुपये होते. ही मर्यादा वाढवून आता ७५,००० करण्यात आली आहे.

Income Tax
ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस कधीपासून सुरु होणार? समोर आली मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com