Income Tax: १२ लाखांचे उत्पन्न खरंच टॅक्स फ्री? नवीन कर प्रणाली कधी लागू होणार? इन्कम टॅक्सबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Income Tax Slab 2025: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी १२ लाखांचे उत्पन्न टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली. या घोषनेनंतर करदात्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर.
Income Tax 2025
Income TaxCanva
Published On

अर्थसंकल्पामध्ये करदात्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. १२ लाखांच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स द्यावा लागणार नसल्याचे घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली आहे. या नवीन कर प्रणालीबाबत अनेक करदात्यांच्या मनात प्रश्न आहेत. ही नवीन करप्रणाली कधी लागू होणार? कर प्रणालीत काय बदल होणार? किती उत्पन्नावर किती टॅक्स द्यावा लागेल? असे अनेक प्रश्न करदात्यांना आहेत. तर आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

Income Tax 2025
Income Tax चा मराठी अर्थ काय? पहिल्यांदा कधी झाली सुरूवात?

1. नवीन कर प्रणाली कधीपासून लागू होणार? (When Will New Tax Regime Implemented)

अर्थमंत्रालयाने सांगितले आहे की, १ एप्रिल २०२५ पासून इन्कम टॅक्समध्ये बदल केले जाणार आहे. याचाच अर्थ असा की, पुढच्या आर्थिक वर्षात ही नवीन कर प्रणाली लागू होणार आहे.

2. नवीन कर प्रणालीतील बदलांसाठी नवीन प्राप्तिकर कायद्याची वाट पाहावी लागणार का?

आयकरमध्ये केलेले बदल अर्थसंकल्पात मंजू केले आहेत. ते पुढील वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन कर प्रणालीसाठी प्राप्तिकर कायद्याची वाट पाहावी लागणार नाही. नवीन कर प्रणालीनुसार तुम्हाला १२ लाखांच्या उत्पन्नावर कर लागणार नाही.

Income Tax 2025
Union Budget 2025 : १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, पण कोणती करप्रणाली निवडावी, जुनी की नवीन? इथं घ्या समजून

3. नवीन प्राप्तिकर कायद्यात काय असणार?

आयकरबाबत नवीन विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे. आयकर कलम १९६१ ला अधिक स्पष्ट आणि सोपे करण्यासाठी विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाली तर नवीन कायदा लागू केले जाणार आहे.

4. नवीन प्राप्तिकर कायद्यामुळे काय होणार? (What Is New Income tax Rule)

टॅक्स प्रक्रिया अधिक सरळ व्हावी, यासाठी नवीन कायदा तयार केला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना साध्या, सोप्या भाषेत टॅक्स सिस्टीमला समजावी, यासाठी हा नवीन कायदा तयार केला जाणार आहे. सध्याचा प्राप्तिकर कायदा सर्वसामान्यांना समजत नाहीये. यामध्ये कॅलक्युलेशन प्रोसेस अधिक सोपे होणार आहे.

5. नवीन कर प्रणालीत टॅक्सपेयर्स कधी शिफ्ट होऊ शकतात? (When Will we Shift To New Tax Regime)

बजेटमध्ये नवीन कर प्रणालीची घोषणा करण्यात आली आहे. ही नवीन कर प्रणाली २०२५-२६ या आर्थिक वर्षात लागू केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिक वर्षात नवीन कर प्रणालीनुसार इन्कम टॅक्स भरु शकतात. यानुसार तुम्हाला १२ लाखांवर कर भरावा लागणार नाहीये.

6. १२.७५ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार? (Is We Have To Pay Tax on 12.75 lakh)

१२ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नाहीये. त्याचसोबत ७५००० रुपये स्टँडर्ड डिडक्शन आहे त्यामुळे त्यावरदेखील तुम्हाला कर भरावा लागणार नाहीये.

7. नवीन कर प्रणाली फायद्याची आहे की नाही? (New Tax Regime)

जर नवीन कर प्रणाली लागू झाली तर तब्बल १ कोटी करदात्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. त्यामुळे जवळपास १०पैकी ९ लोकांना टॅक्स भरावा लागणार नाही.

Income Tax 2025
Budget 2025: ३०० चित्रपट, लाखो नोकऱ्या, करोडोचे उत्पन्न; तरीही बजेटमध्ये का केले जाते बॉलिवूडकडे दुर्लक्ष?

8. जुन्या कर प्रणालीचा लाभ कोण घेणार? (Who Get Benefit Of Old Tax regime)

जुनी कर प्रणाली चॅप्टर ६ १ अंतर्गत टॅक्स डिडक्शनसाठी क्लेम करतात त्यांच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. ज्या लोकांना HRA मिळतो. तसेच ते लोक होम लोन भरत आहे. त्यांना या जुन्या कर प्रणालीचा फायदा होणार आहे. लाइफ इन्श्युरन्स, म्युच्युअल फंड, होम लोन, मेडिकल इन्श्युरन्स, एनपीएसमध्ये गुंतवणूक केलेल्यांना या जुन्या कर प्रणालीचा फायदा होणार आहे.

9.देशातील किती लोक इन्कम टॅक्स भरतात? (How many people in the country pay income tax? )

२०२३-२४ च्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या आकड्यांनुसार, ७.५४ कोटी लोकांनी आयटीआर फाइल केला होता. त्यातील ५.८६ कोटी लोकांचे उत्पन्न ७ लाखांपेक्षा कमी आहे. त्यामुळे फक्त उरलेलं लोक इन्कम टॅक्स भरतात.

Income Tax 2025
BMC Budget : देशातल्या सर्वात मोठ्या महानगर पालिकेचं बजेट सादर, तब्बल 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com