Tax: १२ लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री; पण पगार वाढला तर काय? किती भरावा लागणार कर?

New Tax Regime: १२ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स फ्री केलेला आहे. आता जर तुमचे उत्पन्न १२ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार आहे ते जाणून घ्या.
Tax
TaxSaam Tv
Published On

केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा केली होती. केंद्र सरकारने नवीन टॅक्स रिजीमअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री केले आहे.या स्लॅबचा परिणाम आजपासून होणाऱ्या नोकरदारांच्या पगारावर होणार आहे. १२ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स वाचणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

१ मे म्हणजे आजपासून ज्या लोकांचे पगार होणार आहे त्यांच्यावर या नवीन टॅक्स स्लॅबचा परिणाम होणार आहे. समजा आज १ मे रोजी तुमचा पगार अप्रॅजलसोबत वाढवून येणार आहे. त्यांना किती टॅक्स भरावा लागणार का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

Tax
ITR Filling 2025: इन्कम टॅक्स रिटर्न कधीपासून भरता येणार? फॉर्म 16 कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

समजा एखाद्या व्यक्तीचा मासिक पगार (Salary) १ लाख रुपये आहे. म्हणजेच वर्षाला १२ लाख रुपये पगार आहे. जर या कर्मचाऱ्याने न्यू टॅक्स रिजीम निवडली तर त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. परंतु आता जर पगार वाढवून येणार असेल तर त्यांना १२ लाखांपेक्षा जास्तीच्या पगारावर टॅक्स भरावा लागणार आहे. याआधी ७ लाखांवर कोणताही टॅक्स लागत नव्हता. आता २०२५-२६ मध्ये १२ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही.

१ लाख रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना टॅक्स भरावा लागणार का? (Tax on 1 Lakh Salary Per Month)

जर तुमचा पगार महिन्याला १ लाख रुपये असेल तर मागच्या कर प्रणालीनुसार तुम्हाला ७१५०० रुपये इन्कम टॅक्स भरावा लागला. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला ५९५८ रुपये टॅक्स भरावा लागत होता.

केंद्र सरकारने आता बजेटमध्ये सेक्शन 87A अंतर्गत तहत टॅक्स रिबेट वाढवून ६०,००० केला आहे. यामध्ये १२ लाखांवर ५२,५०० रुपये टॅक्स बसतो. परंतु 87A अंतर्गत तहत टॅक्स रिबेटमुळे तुम्हाला ५२,५०० रुपयांवरही कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. त्यामुळे तुमचा पगार किती आहे यावर तुम्हाला टऍक्स भरावा लागणार की नाही हे समजणार आहे.

Tax
EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बेसिक पेन्शन ७५०० रुपये होणार?

१२.७५ लाखांवर टॅक्स नाही (No Tax On 12.75 Lakh Income)

जर तुम्ही नवीन कर प्रणाली निवडली तर १२ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. तुम्ही ७५००० रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शनचाही फायदा घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला १२.७५ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

Tax
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! रोज ३३३ रुपये गुंतवा अन् फक्त व्याजातून ५ लाख कमवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com