DRDO Recruitment: परीक्षा नाही थेट सरकारी नोकरी; डीआरडीओमध्ये भरती सुरु; पगार ३७०००; आजच अर्ज करा

DRDO Recruitment 2025: डीआरडीओमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओमध्ये सध्या ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
DRDO Recruitment
DRDO RecruitmentSaam Tv
Published On

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओमध्ये (DRDO) नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओमध्ये रिसर्च फेलोशिपसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही.

DRDO Recruitment
PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

डीआरडीओमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी १२ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

डीआरडीओमध्ये रिसर्च फेलो पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमई/नेट / गेट याचसोबत एमएससी, बीई, बीटेक पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २८ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेनुसार सूट देण्यात आली आहे.

डीआरडीओमधील रिसर्च फेलोशिपमध्ये उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३७००० रुपये स्टायपेंडदेखील मिळणार आबे. याचसोबत प्रत्येक महिन्याला एचआरएदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी इंटरव्ह्यू ६ आणि ७ मेनंतर सुरु होणार आहे.

DRDO Recruitment
Anganwadi Bharti: १२वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी; अंगणवाडीत भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

डीआरडीओमध्ये (DRDO Recruitment) रिसर्च फेलोशिप योजनेबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट www.drdo.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करुन तो भरायचा आहे. इंटरव्ह्यूला जाताना कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहे.इंटरव्ह्यू डिफेंस जियोइंफॉर्मेटिक्स रिसर्च इस्टॅब्लिशमेंट हिम परिसर, प्लांट नंबर १०, सेक्टर ३७, ए चंदीगढ १६००३६ येथे होणार आहे.

DRDO Recruitment
Delhi Metro Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार दिल्ली मेट्रोत नोकरी; पगार ६०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com