Anganwadi Bharti: १२वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी; अंगणवाडीत भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

Anganwadi Bharti 2025: अंगणवाडीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी महिलांकडे आहे. लातूर येथे अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Anganwadi Bharti
Anganwadi BhartiSaam Tv
Published On

नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागात नोकरी (Women and Child Welfare Department Recruitment) करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. अंगणवाडीत (Anganwadi Bharti) ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी महिला व बालविकास विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Anganwadi Bharti
IPL Recruitment: IPL मध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

सरकारी विभागात नोकरी(Government Job) करण्याची ही उत्तम संधी आहे. राज्य शासन श्रेणीअंतर्गत तुम्हाला नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. अंगणवाडीत पर्मनंट नोकरी करण्याची संधी असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने फक्त १२वीपास असणे गरजेचे आहे.

अंगणवाडी मदतनीस पदासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यामध्ये १२वीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. विधवा महिला ४० वयोपर्यंत अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराने स्वतः ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. ३३ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.लातूर शहर महानगरपालिका हद्द परिसरात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०२५ आहे.

Anganwadi Bharti
NABARD Job: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी; स्पेशलिस्ट पदासाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

या नोकरीसाठी उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, लातूर शहर, त्रिमूर्ति भवन, पहिला मजला, उदय पेट्रोलपंप बाजूला, बार्शी रोड, लातूर येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारी महिला लातूर महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असावी. अर्जासोबतच शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Anganwadi Bharti
Delhi Metro Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार दिल्ली मेट्रोत नोकरी; पगार ६०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com