ITR Filling 2025: इन्कम टॅक्स रिटर्न कधीपासून भरता येणार? फॉर्म 16 कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

ITR Filling 2025 Start Date: आयटीआर फाइल करण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस लवकरत सुरु होऊ शकते.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On

नवीन आर्थिक वर्ष सुरु झालं आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये करदात्यांना आयटीआर फाइल करावा लागणार आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस सुरु होते. परंतु अजूनपर्यंत आयटीआर फाइल करण्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही.परंतु येत्या काही दिवसांत आयटीआर फाइल करण्याची प्रोसेस सुरु होईल. आयटीआर फाइल करताना कर्मचाऱ्यांकडे फॉर्म १६ असणे खूप गरजेचे आहे. दरम्यान फॉर्म 16 मिळण्याची कर्मचारी वाट पाहत आहे.

ITR Filling
EPFO च्या नियमांत मोठा बदल! आता ऑनलाइन PF क्लेम करणे सोपे; २-३ दिवसांत खात्यात जमा होतील पैसे

ITR फाइलिंग २०२५ कधीपासून होणार सुरु? (ITR Filling Start Date)

आयटीआर फाइल करण्याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. परंतु लवकरच आयटीआर फाइलिंग प्रोसेस सुरु होईल. जसे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज फॉर्म जारी करतील. त्यानंतर २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आयटीआर फाइल करु शकणार आहात.

आयटीआर फाइलिंग मे महिन्यात सुरु होईल. परंतु सॅलरीड कर्मचारी फॉर्म १६ मिळाल्यानंतरच आयटीआर फाइल करु शकतात. तोपर्यंत सॅलरीड कर्मचाऱ्यांना फॉर्म १६ मिळेल.

ITR Filling
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! रोज ३३३ रुपये गुंतवा अन् फक्त व्याजातून ५ लाख कमवा

फॉर्म 16 कधी मिळणार? (When Will Form 16 Get)

सॅलरीड कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म 16 हा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये तुमच्या वर्षभराच्या सॅलरी आणि टीडीएसची माहिती असते. कंपन्यांना १५ जून२०२५ पर्यंत फॉर्म १६ देणे अनिवार्य आहे. त्यानंतर सॅलरीड कर्मचारी आयटीआर फाइल करु शकतात.

आयटीआरबाबतच्या (ITR) महत्त्वाच्या तारखा

आयटीआर फाइलिंग सुरु होण्याची संभाव्य तारीख- एप्रिल- मे २०२५ (ITR Filling Tentative Date)

फॉर्म १६ मिळण्याची अंतिम तारीख-१५ जून २०२५ (Form 16 Date)

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख-३१ जुलै २०२५ (ITR Filling Last Date)

ITR Filling
ITR Filing: ITR फाइल करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com