ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रूपये किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्ही ITR भरु शकता. ITR भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज असते. जाणून घ्या.
हा फॉर्म कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिला जातो. यात कर्मचाऱ्याच्या पगाराची आणि पगारातून कापलेल्या कराची संपूर्ण माहिती असते.
पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्नावर जसे की फिक्स्ड डिपॉजिट किंवा मालमत्तेच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्नावर कापलेल्या टीडीएससाठी हे फॉर्म आवश्यक आहेत. फॉर्म १६ अ बँकेकडून जारी केला जातो तर फॉर्म १६ब मालमत्तेच्या व्यवहारांशी संबंधित असतो. आणि फॉर्म १६क भाड्याच्या उत्पन्नाशी संबंधित असतो.
हा फॉर्म आयकर विभागाकडून जारी केला जातो. आयकर विभागाच्या बेवसाइटवर, पॅन क्रमांक टाकून हा फॉर्म मिळवू शकता. यामध्ये करदात्याच्या उत्पन्नावर आकारल्या जाणाऱ्या संपूर्ण कराची माहिती असते.
तुम्हाला तुमच्या आयटीआरमध्ये सर्व बँक अकाउंटची माहिती उघड करावी लागते. सेव्हिंग अकाउंटवर किंवा फिक्स्ड डिपॉजिटवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल सांगण्यासाठी बँक स्टेटमेंट किंवा पासबुक गरजेचे आहे.
जर तुम्हाला गृहकर्जाच्या व्याजावर करसवलत मिळवायची असेल तर तुमच्याकडे होमलोन इंटरेस्ट सर्टिफिकेट असायला हवे. ITR फाइल करताना याची आवश्यकता असते.
अनेक करदाते कर वाचवण्यासाठी काही गुंतवणूक करतात. ITR भरताना याचा पुरावा देणे आवश्यक आहे. हे गुंतवणूक पुरावे, एलआयसी प्रीमियम पावत्या, पीपीएफ गुंतवणूक पासबुक, ईएलएसएसचा पुरावा, देणगी पावत्या असू शकतात.
याशिवाय ITR फाइल करताना कॅपिटेल गेनची माहिती, भाड्याचे उत्पन्न, परदेशातील उत्पन्न, डिविडेंड इनकम पॅनकार्ड आणि आधार कार्ड सारखे कागदपत्र असणे आवश्यक आहे.