ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात बहुतांश लोक ट्रेनने प्रवास करतात. रिजर्वेशनशिवाय, ट्रेनने लांबचा प्रवास करणे खूप कठिण आणि थकवणारे आहे. यासाठी लोक महिनाभर आधीच तिकीट बुक करतात.
अनेकदा अत्यावश्यक कामासाठी किंवा इमर्जन्सीमध्ये लोकांना ट्रेनने प्रवास करायचा असतो तेव्हा तात्काळ तिकीट बुक केले जाते. घरबसल्या तात्काळ तिकीट कसं बुक करायच, जाणून घ्या.
वेबसाईटवर तुम्हाला बुकिंग ऑप्शन दिसेल. यामध्ये तात्काळ पर्याय निवडा.
तुमच्या ट्रेनचे नाव, तारीख, वेळ आणि सीट निवडा. प्रवास करणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती जसे की, नाव, वय भरा.
यानंतर तुम्हाला रिव्यूचा ऑप्शन येईल. यामध्ये तुमचे तपशील काळजीपूर्वक तपासून घ्या.
आता, पेमेंट मोड निवडा. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा पर्याय निवडून पेमेंट करा.
आता तात्काळ तिकीटचा कोटा उघडताच, बुकिंग कन्फर्म करा. याचाच अर्थ तुमचे तात्काळ तिकीट बुक झाले आहे.