ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई - पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने येथे दरवर्षी हजारो पर्यटक पिकनिकसाठी येतात.
उन्हाळ्यामध्ये पिकनिकसाठी हे एक परफेक्ट ठिकाणं आहे. तुम्ही येथे कॅम्पिंगपासून ट्रेकिंगपर्यंतचा आनंद घेऊ शकता.
लोणावळ्यापासून काही अंतरावर कारला लेणी आहे. येथे प्राचीन काळातील दगडांवर कोरलेल्या बुद्धाच्या लेणी आहेत. मुलांना येथे नक्की घेऊन जा.
जर तुम्ही लोणावळ्याला जात असाल, तर लोणावळा सरोवरला भेट द्यायला विसरु नका. येथील मनमोहक दृश्ये आणि नैसर्गिक सौंदर्य मनाला भुरळ घालते.
भुशी डॅम आणि अॅम्बी व्हॅलीच्या मध्ये लायन्स पॉईंट आहे. हिरवेगार डोंगर, धबधबे आणि शांत वातावरण तुमची ट्रिप अविस्मरणीय होईल.
जर तुम्हाला कॅम्पिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर येथे नक्की जा. तुम्हाला येथे निसर्ग, अॅडव्हेंचर आणि ऐतिहासिक वारसा यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळेल.
लोणावळ्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे पावना लेक. तुम्ही येथे ट्रेकिंग, अॅडव्हेंचर आणि कॅम्पिंग करु शकता.