.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मार्च महिना हा पैशांसंबधित कामांसाठी खूप महत्त्वाचा समजला जातो. ३१ मार्चपूर्वी पैशांसंबधित काही कामे करणे गरजेची आहेत. यात अपडेटेड आयटीआरचा समावेश होते. तुम्ही २०२३-२४ साठी अपडेटेड आयटीआर फाइल करु शकतात. तुम्ही ३१ मार्च २०२५ पूर्वी आयटीआर फाइल करु शकतात. जर तुम्ही ३१ तारखेपर्यंत अपडेटेड आयटीआर फाइल केला तर अतिरिक्त २५ टक्के टॅक्स लागणार आहे. यानंतर तुम्हाला ५० टक्के अतिरिक्त टॅक्स भरावा लागणार आहे. अपडेटेड आयटीआर म्हणजे काय? हा आयटीआर कोणाला भरावा लागतो? जाणून घ्या सर्वकाही.
अपडेटेड आयटीआर (ITR-U) काय आहे? (What Is Updated ITR)
अपडेटेड आयटीआर हा एक फॉर्म आहे. हा फॉर्म भरुन करदाते आपल्या आधीच्या आयकर रिटर्नमधील चुका सुधारू शकतात. तुम्ही आर्थिक वर्षानंतर दोन वर्ष हा अपडेटेड आयटीआर फाइल करु शकतात. जे लोक आयटीआर आणि बिलेटेड आयटीआर फाइल करु शकले नाही ते लोक ITR-U फाइल करु शकतात.
दंड
जर तुम्ही ३१ मार्च २०२५ आधी अपडेटेड आयटीआर फाइल केला तर तुम्हाला २५ टक्के अतिरिक्त टॅक्स आणि त्यावर व्याजदेखील भरावे लागणार आहे.
जर तुम्ही ३१ मार्चनंतर अपडेटेड आयटीआर फाइल केला तर ५० टक्के अतिरिक्त टॅक्स आणि व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त दंड भरावा लागणार आहे.
अपडेटेड आयटीआर कसा फाइल करायचा? (How To File Updated ITR)
सर्वप्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर जाऊन ITR-U फॉर्म डाउनलोड करा.
ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन लॉग इन करा त्यानंतर ITR-U निवडा.
यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा. त्यानंतर अतिरिक्त टॅक्स निवडून शुल्क भरा.
फॉर्म भरल्यानंतर आधार ओटीपी, नेट बँकिंगद्वारे वेरिफाय करा.
नवीन नियम (ITR New Rule)
आता तुम्ही अपडेटेड आयटीआर वर्षांपर्यंत भरु शकतात. दोन वर्षांची मूदत वाढवून ४ वर्षे करण्यात आली आहे. यामुळे आर्थिक वर्षानंतर ४ वर्षात अपडेटेड आयटीआर फाइल करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.