ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घटस्फोटानंतर बायकोला पोटगी दिली जाते.
महिलांना घटस्फोटानंतर त्यांच्या पालनपोषणासाठी नवऱ्याकडून पोटगी मिळते.
जर बायकोदेखील पैसे कमवत असेल तर त्या दोघांच्या उत्पन्नातील तफावत लक्षात घेऊन पोटगी दिली जाते.
जर नवरा दिव्यांग असेल आणि काहीच पैसे कमवत नसेल तर कदाचित बायकोलाही पोटगी द्यावी लागते.
पोटगीवर टॅक्स भरावा लागतो का?
पोटगी दोन प्रकारांमध्ये दिली जाते. एक म्हणजे घटस्फोटानंतर ठरावीक रक्कम दिली जाते. याचसोबत बायकोला प्रत्येक महिन्याला पैसे दिले जातात.
आयकर कायदा १९६१ नुसार, जर एकरकमी पैसे दिले तर त्यावर कोणताही कर लागत नाही.
जर दर महिन्याला पैसे दिले जातात तर ते महसूल पावती (Revenue Recipt) म्हणून समजले जाते. त्यावर कर भरावा लागतो.