
तुम्हाला इनकम टॅक्स भरायचा आहे, तर काळजी नको, तुम्ही घरी बसून इनकम टॅक्स भरू शकतात. फाइलिंगसाठी करदात्यांना फक्त त्यांचा पॅन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP मिळेल. पडताळणी पूर्ण करून, तुम्ही तुमचा कर भरू शकतात. दरम्यान करदात्यांच्या सोयीसाठी आयकर विभाग वेळोवेळी नियमांमध्ये बदल करत असते.
आताही आयकर विभागाने करदात्यांसाठी भारी सुविधा आणलीय. आता करदाते लॉगिन आयडी आणि पासवर्डशिवायही त्यांचा आयकर ऑनलाइनने भरू शकतात. यासाठी आयकर विभागाने 'ई-पे टॅक्स' नावाचे ई-फाइलिंग पोर्टल सुरू केलंय. याबाबतची माहिती केंद्रीय डायरेक्ट टॅक्स बोर्डाने दिलीय.
नवीन सुविधेनंतर करदात्यांना आयकर भरण्यासाठी युझर नेम किंवा पासवर्डची आवश्यकता नसणार आहे. ई-फाइलिंगसाठी त्यांना फक्त त्यांचा पॅन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP मिळेल. पडताळणी पूर्ण करून, तुम्ही थेट कर भरू शकता.
'ई-पे टॅक्स' सुविधेद्वारे, करदात्याला प्रथम कराच्या प्रकाराबद्दल (आयकर, आगाऊ कर किंवा कोणत्याही प्रकारचा दंड) याची माहिती द्यावी लागेल. यानंतर तपशील प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 'आता पैसे द्या' या पर्यायावर क्लिक करून पेमेंट पूर्ण करावे लागेल.
ऑनलाइन कर भरण्यासाठी, तुम्हाला ई-पे टॅक्स पोर्टलला भेट द्यावी लागेल.
येथे ई-पे टॅक्स पर्याय निवडा.
आता तुमचा पॅन कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
पडताळणीसाठी तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
ओटीपी पडताळल्यानंतर, तुम्हाला आयकर किंवा आगाऊ कर निवडावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला काही माहिती भरण्यास सांगितले जाईल.
फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला PAY NOW निवडावा लागेल.
आता एक नवीन विंडो उघडेल. त्यात पेमेंट पर्याय असेल.
पेमेंट केल्यानंतर लगेचच, तुम्हाला ई-मेल आणि एसएमएसद्वारे एक स्लिप पाठवली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.