Google Pay मिटवेल तुमची आर्थिक चणचण! Google Pay देतंय १० लाखांचं Personal Loan, कसा कराल अर्ज, जाणून घ्या?

Personal Loan Application: तात्काळ रोख रक्कम मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वैयक्तिक कर्ज. बँकांपासून ते एनबीएफसीपर्यंत, प्रत्येकजण वैयक्तिक कर्ज देतो. आता या व्यवसायात डिजिटल वॉलेट्सनेही प्रवेश केलाय.
Google Pay
Personal Loan Applicationsaam tv
Published On

डिजिटल वॉलेट गुगल पे (GPay) देशातील अनेक बँकांच्या भागीदारीतून वैयक्तिक कर्ज Personal Loan देत आहे. बँक ३० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे त्वरित वैयक्तिक कर्ज देत आहे. कर्जाचा कालावधी ६ महिने ते ५ वर्षांपर्यंत असतो. जर तुम्ही गुगल पे वरून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल याबद्दल काही गोष्टी माहित असायला हव्यात.तसेच तुम्ही गुगल पे द्वारे कर्जासाठी अर्ज कसा करू शकता हे जाणून घेऊ.

व्याजदर १०.५०% ते १५%

जर तुम्ही गुगल पे वरून कर्ज घेत असाल तर तुम्हाला १०.५०% ते १५% पर्यंत व्याज द्यावे लागू शकते. क्रेडिट स्कोअरच्या आधारे व्याजदर ठरवला जात असतो. कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे . त्यासाठी कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय किमान २१ वर्षे असणे आवश्यक आहे.नियमित उत्पन्नाचा स्रोत असणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या बँक खात्यातून EMI पेमेंट कापले जातात.

Google Pay
ATM Rule Change: मे महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना फटका; ATMमधून पैसे काढणे पडणार महागात

कर्जासाठी अर्ज कसा करावा

गुगल पे अ‍ॅप उघडा आणि मनी टॅबवर जा.

कर्ज विभागात उपलब्ध असलेल्या ऑफर्स बघा.

उपलब्ध ऑफरवर टॅप करा आणि सूचनांचे पालन करा.

केवायसी कागदपत्रे अपलोड करा आणि कर्ज करारांवर ई-स्वाक्षरी करा.

कर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

Google Pay
UPI News: चुकूनही दुसऱ्याला जाणार नाही पैसे; UPI मध्ये होणार 'हा' मोठा बदल

कर्ज भरण्याची प्रक्रिया

गुगल पे द्वारे कर्जाचा मासिक ईएमआय थेट तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून कापला जाईल. म्हणून, दंड टाळण्यासाठी पुरेसा पैसा खात्यात ठेवणं महत्वाचे आहे. कर्ज अर्ज करताना परतफेडीचे वेळापत्रक, देय तारखा आणि रकमेसह, इतर माहिती दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com