ATM Cash Withdrawal: एटीएममध्ये मिळणाऱ्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय

ATM Cash Withdrawal: देशातील ७५ टक्के एटीएममध्ये १०० किंवा २०० रुपयांच्या बँक नोटा वितरित झाल्या पाहिजेत. एटीएममध्ये जास्त जास्त १०० आणि २०० रुपयांच्या नोटा असाव्यात. या नोटा नियमितपणे उपलब्ध असल्याची खात्री करावी.
ATM Cash
ATM Cash WithdrawalEsakal
Published On

RBI Big Decision on 100 And 200 Notes: जर तुम्ही तुमच्या बँक खात्यातील पैसे एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदाची आहे. आता प्रत्येक एटीएममध्ये सुट्टे पैशांची उपलब्धता वाढणार आहे. हो, एटीएममधू बहुतेकवेळा ५०० रुपयांच्या नोटा जास्त उपलब्ध असतात. त्यामुळे अनेकांना सुट्टे पैशांची मोठी अडचण निर्माण होत असते. ही बाब लक्षात घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएममधून १०० आणि २०० रुपयांच्या नोटा काढण्याबाबत एक नवीन अधिसूचना जारी केली आहे.

सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (डब्ल्यूएलएओ) त्यांच्या एटीएममधून नियमितपणे १०० आणि २०० रुपयांच्या नोटा वितरित होतील याची खात्री करण्यात यावी, असे निर्देश आरबीआयनं दिलेत. जनतेच्या सोयीसाठी आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या या नोटा चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हाव्यात यासाठी, आरबीआयनं हा निर्णय घेतलाय.

ATM Cash
UPI News: चुकूनही दुसऱ्याला जाणार नाही पैसे; UPI मध्ये होणार 'हा' मोठा बदल

आरबीआयची सूचना काय आहे?

बँका आणि एटीएम ऑपरेटर्सनी त्यांच्या एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा नियमितपणे उपलब्ध असल्याची खात्री करावी.

हा निर्णय टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल.

यामुळे सामान्य लोकांना लहान मूल्याच्या नोटांची उपलब्धता सुधारेल.

तसेच लोकांना दैनंदिन व्यवहारात मदत होईल, विशेषतः ज्या भागात कमी किमतीच्या नोटांची गरज जास्त आहे.

कोणते बदल होतील?

आरबीआयने आपल्या ताज्या अधिसूचनेत म्हटले की, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, ७५ टक्के एटीएममधून १०० किंवा २०० रुपयांच्या नोटांची किमान एक कॅसेट वितरित करावी. तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत, ९०% एटीएममध्ये किमान एका कॅसेटमधून १०० किंवा २०० रुपयांच्या नोटा वितरित केल्या जातील. दरम्यान रिझर्व्ह बँकेने २०१७ मध्ये २०० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या.

ATM Cash
ATM Rule Change: मे महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना फटका; ATMमधून पैसे काढणे पडणार महागात

व्हाईट लेबल एटीएम (WLA) म्हणजे काय?

व्हाईट लेबल एटीएम म्हणजे असे एटीएम जे बँकांऐवजी खासगी (बँकिंग नसलेल्या) कंपन्यांकडून बसवले असतात. या एटीएममधून बँकेच्या एटीएमप्रमाणेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढणं, बॅलन्स तपासणं आणि इतर सुविधांचा लाभ घेऊ घेता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com