
आर्थिक वर्ष २०२५-२६ लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे अनेक पैशांसंबंधित कामे याच महिन्यात करुन घ्या. जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये टॅक्स वाचवण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आता फक्त १० दिवस उरले आहेत. ३१ मार्च २०२५ पर्यंत टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे.
गुंतवणूकीवर टॅक्स सवलत मिळते. त्यामुळे आताच गुंतवणूक करा अन्यथा तुम्हाला चांगलाच टॅक्स भरावा लागेल. जर तुम्ही जुनी कर प्रणाली निवडली तर तुम्हाला टॅक्समध्ये मोठी सूट मिळेल. तुम्ही ३१ मार्चपर्यंत या ठिकाणी गुंतवणूक करा.
आयकर कलम 80C अंतर्गत सूट
तुम्हाला टॅक्स भरताना कलम 80C अंतर्गत सूट मिळते. यामध्ये १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर तुम्ही टॅक्सपासून सवलत मिळवू शकतात.
ELSS- टॅक्स वाचवण्यासोबत चांगली गुंतवणूक करण्यासाठी ELSS मध्ये गुंतवणूक करु शकतात.
सुकन्या समृद्धी योजना- मुलींसाठी ही योजना आहे. यात १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर सूट मिळते.
टॅक्स सेव्हिंग एफडी- ५ वर्षांच्या लॉक इन कालावधीसाठी ही एफडी असते.
लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी- ही एक टर्म प्लान आहे. तसेच अनेक विमा योजनांमध्ये टॅक्स सवलत मिळते.
मुलांची ट्युशन फी- दोन मुलांच्या शाळेच्या फीवर तुम्हाला टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो.
एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला अतिरिक्त टॅक्स वाचवता येणार आहे. जर तुम्ही बेसिक सॅलरीमधील १० टक्के रक्कम गुंतवत असाल तर १.५ लाखांपर्यंत टॅक्स सूट मिळते. तसेच कलम 80CCD (1B)अंतर्गत अतिरिक्त ५०,००० रुपयांची सूट मिळते.
जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी किंवा मुलांसाठी इन्श्युरन्स घेत असाल तर त्यावरही सूट मिळते. ६० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांसाठी २५००० रुपयांपर्यंत टॅक्स सूट मिळते. ६० पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी इन्श्युरन्स घेत असाल तर ५०००० रुपयांची सूट मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.