Tax Saving : 80C अंतर्गत फायदा, १.५ लाखांपर्यंत वाचवा टॅक्स; कुठे कुठे गुंतवणूक कराल? जाणून घ्या सविस्तर

Tax Saving Tips: आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे. या नवीन वर्षात जर तुम्हाला टॅक्सपासून सूट हवी असेल तर ३१ मार्चपर्यंत वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूत करु शकतात.
Tax Saving Schemes
Tax Saving SchemesSaam Tv
Published On

२०२४-२५ आर्थिक वर्ष आता लवकरच संपणार आहे. या वर्षी टॅक्सपासून सूट मिळण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे अपेक्षित होते. जेणेकरुन तुम्हाला चांगला परतावा तर मिळेल याचसोबत लाखो रुपयांच्या गुंतवणूकीवर टॅक्स सूटदेखील मिळेल. जर तुम्ही अजूनही टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केली नसेल तर लगेच करा. तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करु शकतात.

Tax Saving Schemes
Income Tax Bill: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नवीन आयकर विधेयक केले सादर; काय बदल होणार? जाणून घ्या

जर तुम्ही जुनी कर प्रणाली स्विकारली असेल तर तुम्हाला टॅक्स डिडक्शनची चांगला फायदा होऊ शकतो. तसेच नवीन कर प्रणालीतही कर कपातीचा फायदा मिळवू शकतात.

टॅक्स डिडक्शनसाठी तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत लाभ घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर कर सवलत मिळते.

जुन्या कर प्रणालीत कलम 80C अंतर्गत १.५ लाखांवर टॅक्स डिडक्शन मिळते. या सेक्शनचा फायदा वैयक्तिक करदात्यांना जास्त होतो. यामध्ये तुम्ही जीवन विमा प्रिमियम, ईपीएफ, वीपीएफ, एलआयटी अॅन्युटी प्लानमध्ये गुंतवणूक, नॅशनल पेन्शन स्कीन, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, एफडी, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करु शकतात.

कलम 80CCC अंतर्गत सूट

तुम्ही एलआयसी किंवा कोणत्याही विमा कंपनीत अॅन्युटी प्लानमध्ये गुंतवणूक करुन टॅक्स डिडक्शनपासून सूट मिळवू शकतात. यामध्ये तुमची व्याजासहित रक्कम ही इन्कम टॅक्स अंतर्गत येते.

Tax Saving Schemes
Chhaava Tax Free : छावा महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

कलम 80CCD(1B)

जर कोणताही कर्मचारी एनपीएस अकाउंटमध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याला ५०,००० रुपयांवर टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो. यामध्ये ६० टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर मिळते. उरलेली रक्कम पेन्शन स्वरुपात दिली जाते.

कलम 80CCD(2)

एनपीएस योजनेत कर्मचारी सेक्शन कलम 80CCD(2) अंतर्गत टॅक्स डिडक्शनसाठी क्लेम करु शकतात. यामध्ये तुम्हाला टॅक्सपासून सूट मिळते.

Tax Saving Schemes
Tax Saving: टॅक्स वाचवण्यासाठी शेवटचा महिना..., या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् आयकर वाचवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com