Tax Saving
Tax SavingSaam Tv

Tax Saving: टॅक्स वाचवण्यासाठी शेवटचा महिना..., या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा अन् आयकर वाचवा

Tax Saving Scheme: टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही अनेक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावादेखील मिळतो.
Published on

आर्थिक वर्ष संपणार आहे. १ एप्रिल २०२५ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. नवीन वर्षात फायनान्शियल प्लानिंग करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. तुम्ही या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर टॅक्स वाचेल त्याचसोबत तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची ते सांगणार आहोत.

३१ मार्चच्या आधी गुंतवणूक गरजेची

तुम्हाला ३१ मार्चआधी गुंतवणूक करण्याची गरजेची आहे. जेणेकरुन तुम्हाला आयटीआर भरताना डिडक्शन मिळणार आहे.तसेच आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळेल.

Tax Saving
MSSC Scheme: पोस्टाची 'ही' योजना होणार बंद? मिळतंय भरघोस व्याज; गुंतवणूकीसाठी उरले १५ दिवस

PPF मध्ये गुंतवणूक (PPF)

जर तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक केली तर तुमचा टॅक्स वाचणार आहे. या योजनेत ७.१ टक्के व्याज मिळते. तसेच यामध्ये १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्सपासून सूट मिळते. या योजनेत तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो.

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)

तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. यामध्ये तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे. या योजनेत कलम 80C अंतर्गत सूट मिळते. त्यामुळे १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्स मिळणार नाही. तसेच कलम 80CCD (1B)अंतर्गत अतिरिक्त ५० हजारांची गुंतवणूकदेखील करु शकतात. म्हणजेच तुम्हाला २ लाखांवर टॅक्सपासून सूट मिळणार आहे.

Tax Saving
PPF Scheme: रोज १०० रुपये गुंतवा अन् २० वर्षात १५ लाख मिळवा; सरकारच्या या योजनेत मिळतो डबल रिटर्न

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana)

तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करुन टॅक्स वाचवू शकतात. या योजनेतदेखील १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्स बेनिफिट मिळते. याचसोबत या योजनेत सर्वात जास्त व्याजदर मिळते. ८.२ टक्के व्याजदर मिळते. त्यामुळे टॅक्ससोबत मुलींच्या भविष्याचीही चिंता आता मिटणार आहे. या योजनेत १० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलींच्या नावाने अकाउंट उघडू शकतात.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही लोकप्रिय स्कीम आहे. या योजनेत तु्म्ही भविष्यासाठी काही तरतूद करु शकतात. या योजनेत १.५ लाखांच्या गुंतवणूकीवर टॅक्स बेनिफिट मिळते. या योजनेतदेखील ८. २ टक्के व्याज मिळते.

Tax Saving
Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' योजनेत एकदाच करा गुंतवणूक, दर महिन्याला मिळतील ५,५५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com