UPS: युनिफाइड पेन्शन स्कीम १ एप्रिलपासून लागू होणार; कर्मचाऱ्यांना किती पेन्शन मिळणार? वाचा कॅलक्युलेशन

UPS Calculation: १ एप्रिलपासून युनिफाइड पेन्शन स्कीम लागू करण्यात येणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना दर महिन्याला १०,००० रुपये पेन्शन मिळणार आहे.
UPS
UPSSaam Tv
Published On

केंद्र सरकार यूनिफाइड पेन्शन स्कीम लागू करणार आहे. १ एप्रिलपासून ही नवीन पेन्शन स्कीम लागू होणार आहे. ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टीमअंतर्गत येते. या नवीन युनिफाइड पेन्शन स्कीअंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. एनपीएसमध्ये पेन्शन ही मार्केटवर आधारित असते. तर युनिफाइड पेन्शन योजनेत १०,००० रुपये महिन्याला पेन्शन मिळते.

UPS
PPF Scheme: रोज १०० रुपये गुंतवा अन् २० वर्षात १५ लाख मिळवा; सरकारच्या या योजनेत मिळतो डबल रिटर्न

यूनिफाइड पेन्शन स्कीम ही १ एप्रिलपासून लागू होते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने NPS सोडून UPS पेन्शन स्कीम निवडते तर तो कर्मचारी पुन्हा एनपीएस स्कीमचा लाभ घेऊ शकत नाही. या योजनेता फायदा एनपीएसअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळतो.

UPS अंतर्गत किती मिळणार पेन्शन?

पेन्शनसाठी कर्मचाऱ्याच्या पगारातून ठरावीक रक्कम दर महिन्याला जमा केले जातात. पेन्शन कशी मोजतात ते जाणून घ्या.

पेन्शन- ५०%x (मागच्या १२ महिन्यातील बेसिक सॅलरी/ 12)

जर कर्मचाऱ्याने २५ किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी सर्व्हिस केली असेल तर त्यांना पूर्ण पेन्शन मिळणार आहे. जर २५ वर्षांपेक्षा कमी काळासाठी सर्व्हिस केली तर तुमची काही पेन्शन कापली जाईल.

UPS
EPFO चा मोठा निर्णय! PF वरील व्याजदर कायम ठेवले; ८.२५ टक्के मिळणार

जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी १,००,००० रुपये असेल तर त्याला पेन्शन ५०,००० रुपये मिळणार आहे. ५०%x १,००,०००= ५०,००० रुपये

जर एखाद्या व्यक्तीची बेसिक सॅलरी १५,००० रुपये असेल तर त्याला पेन्शन ७,५०० रुपये मिळते. परंतु नवीन स्कीममध्ये १०,००० रुपये गॅरंटीड पेन्शन मिळते.त्यामुळे ही पेन्शन अधिक फायदेशीर आहे. या स्कीममध्ये कोणत्याही प्रकारची जोखिम नसते. तसेच एनपीएसमध्ये तुम्हाला मार्केटद्वारे पेन्शन मिळते.

UPS
PF Balance: तुमच्या PF अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा होतात का? घरबसल्या ५ मिनिटांत करा चेक, या स्टेप्स करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com