
प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातून पैसे कापले जातात.यात कंपनीदेखील पैसे जमा करते. हे पैसे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला दिले जातात. ही एक सुरक्षित योजना आहे. या योजनेत सरकार तुम्हाला व्याजदर देते. दरम्यान, या योजनेत दर महिन्याला पैसे जमा होतात की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात.
दर महिन्याला बेसिक सॅलरीच्या १२ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या पीएफ अकाउंटनध्ये जमा करतात. या योजनेत सर्वाधिक व्याजदर मिळते. या योजनेत कंपनी खरंच तुमच्या अकाउंटला पैसे जमा करते का?तुम्हाला व्याजदर मिळते का?तुमचा पीएफ खात्यातील बॅलेन्स किती हे चेक करण्यासाठी सोपी स्टेप फॉलो करा.
पीएफ खात्यातील बॅलेंस चेक कसा करायचा? (How To Check PF Balance)
सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर सर्व्हिसेस या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.
यानंतर फॉर एम्प्लॉइज या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही पासबुक या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.
यानंतर स्क्रिनवर नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे.त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर अशी माहिती भरायची आहे.
यानंतर तुम्ही माहित वेरिफाय करा. तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो टाका. त्यानंतर तुम्ही तुमचा पीएफ बॅलेन्स बघू शकता.
तुम्ही SMS द्वारेदेखील पीएफ बॅलेंस चेक करु शकतात. यासाठी तुमचा नंबर ईपीएफओ पोर्टलवर रजिस्टर असायला हवा. त्यासाठी 7738299899 या नंबरवर मेसेज करायचा आहे. <EPFOHO UAN ENG> हा मेसेज पाठवायचा आहे.यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे तुमच्या पीएफ बॅलेंसची माहिती मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.