
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी लवकरच ग्राहकांसाठी नवीन सुविधा लाँच करणार आहे. यामुळे ईपीएफ कर्मचारी यूपीआयद्वारे पैसे काढू शकणार आहे. पीएफ अकाउंटमध्ये पैसे काढण्यासाठी त्यांना आता बँकेत जायची गरज नाही. ईपीएफओ लवकरच ही सुविधा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करणार आहे. (EPFO)
याआधी ईपीएफओने एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा दिली होती. त्यानंतर आता ऑनलाइन यूपीआय अॅपद्वारे पैसे काढू शकणार आहात. तुम्ही घरबसल्या पेटीएम, गुगल पे आणि फोन पे या अॅपवरुन पीएफची रक्कम स्वतः च्या बँक खात्यात ट्रान्सफर करु शकणार आहेत.त्यामुळे ईपीएफओ सदस्यांचे काम कमी होणार आहे. अवघ्या काही मिनिटातच तुम्ही पैसे ऑनलाइन पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करु शकणार आहात.
मिडिया रिपोर्टनुसार, ईपीएफओ लवकरच यूपीआय इंटिग्रेशन सेवा सुरु करणार आहे. पुढच्या २ ते ३ महिन्यात ही सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरु होऊ शकते. यामुळे तुम्ही कमी कालावधीत पीएफमधील पैसे काढू शकणार आहात.
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे कसे काढावे?
ईपीएफओने अद्याप यूपीईयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची सुविधा सुरु केली नाही. परंतु लवकरच ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम, फोनपे, गुगल पे अॅप डाउनलोड करावा लागेल. याला बँक अकाउंट लिंक करावे लागेल. त्यानंतर EPFO Withdrawal हा ऑप्शन निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला यूएएन नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्ही पीएफचे पैसे काढू शकतात.
ईपीएफओच्या नियमानुसार, वैद्यकीय, होम लोन, शैक्षणिक खर्चासाठी पीएफचे पैसे काढू शकतात. त्यासाठी तुम्हाला रक्कम टाकावी लागेल. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर ओटीपी द्यावी लागणार आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन पूर्ण करावे लागणार आहे.
केवायसी पूर्ण करावे लागणार
पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट ही माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने केवायसी करावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.