Swargate Bus Depot Case: पैसे घेऊन सहमतीने शारीरिक संबंध झाले का? पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेची पोलखोल

Pune Swargate Bus depot Case: मंगळवारी स्वारगेट डेपोत उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. मात्र हा बलात्कार नाही तर सहमतीने शरीरसंबंध ठेवल्याचा दावा आरोपी दत्तात्रय गाडे केला होता.
Swargate bus depot
Swargate bus depot News Saam tv
Published On

स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दत्तात्रय गाडे याने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी पीडित तरुणीवरच खळबळजनक आरोप केले. संबंधित तरुणीवर कुठलीही बळजबरी केली नाही. तिनेच बोलावले आणि आम्ही बसमध्ये गेलो. तिने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले. तसेच त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही उपस्थित होता.

यामुळे आमच्या दोघांमध्ये जे घडले ते संमतीने झाले, असा दावा दत्तात्रय गाडे आणि त्याच्या वकिलांनी केला. इतकेच नाही तर दत्तात्रय गाडेच्या पत्नीनेही नवऱ्याची बाजू उचलून धरली. बलात्कार झाला तर मग तरुणीचे कपडे फाटले का नाहीत? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं का दिसत नाही? बसमध्ये आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का?, असा सवाल गाडेच्या बायकोने केला होता.

Swargate bus depot
Swargate Bus Deopt Case: शिवशाही अत्याचार प्रकरणात ट्विस्ट; पीडित तरुणीबाबत फलटण पोलिसांकडून मोठा खुलासा

दत्तात्रय गाडेने वकिलांमार्फत पीडित तरुणीला महिनाभरापासून ओळखत होतो, असाही दावा केला होता. त्यामुळे या दोघांच्या फोन कॉलची चौकशी व्हावी, अशी मागणी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी आरोपी आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासले. परंतु दोघांमध्ये कोणताच संपर्क झाला नव्हता. आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात नव्हते दिसून हे आले. असं वृत्त लोकमत या वृत्तसंस्थेने दिले आहे.

पैसे देऊन सहमतीने शरीर संबंध झाले?

अटक केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने आपण तरुणीवर अत्याचार केला नाहीत तर तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले होते. त्यासाठी तिला साडेसात हजार रुपये दिले होते, असा दावा केला होता. गाडेच्या वकिलांनीही तोच दावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेच्या बँकेची तपासणी केली. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. दत्तात्रय गाडेच्या बँक खात्यात महिन्याभरापासून फक्त २४९ रुपये आहेत.

Swargate bus depot
Swargate Bus Depot Case: स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरण; आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

बलात्काराच्या घटनेपूर्वीपासून त्याच्या बँक खात्यात फक्त २४९ रुपये शिल्लक असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी दावा केल्याप्रमाणे तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी जे ७५०० रुपये देण्यात आले, ते पैसे कुठून आले, असा प्रश्न उपस्थित होतोय. गुन्हा घडल्यानंतर दत्तात्रय गाडेने आपला मोबाईल बंद केला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर दत्तात्रय गाडेला ताब्यात घेऊन त्याचे बँक खाते, डिजिटल व्यवहार, ऑनलाईन पेमेंट या सगळ्याची सखोल चौकशी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com