Swargate Bus Deopt Case: शिवशाही अत्याचार प्रकरणात ट्विस्ट; पीडित तरुणीबाबत फलटण पोलिसांकडून मोठा खुलासा

Pune Swargate Bus Deopt Case Update: स्वारगेट अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट हाती आलीय. अत्याचारातील आरोपी दत्तात्रेय गाडेला न्यायालयालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. आता या प्रकरणात नवा खुलासा झालाय.
Pune Swargate Bus Deopt  Case Update
Pune Swargate Bus Deopt Case UpdateSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर राज्यभरातून संतप्त पडसाद उमटले. अत्याचार झालेली तरुणी फलटणची असल्याचं म्हटलं जात होतं मात्र याप्रकरणी मोठा ट्विस्ट मिळालाय. पीडिता फलटणची नसल्याचा खुलासा फलटण पोलिसांनी दिलाय.

पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या दुर्दैवी घटनेतील ती पीडित युवती फलटण शहर किंवा तालुक्यातील नसल्याची माहिती फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिलीय. तीन दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले होते. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

Pune Swargate Bus Deopt  Case Update
Swargate Bus Depot Case: स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरण; आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

पोलिसांनी अत्याचार झालेली युवती फलटण तालुक्यातील असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र याच दरम्यान प्रकरणाने मोठा ट्विस्ट घेतलाय. ही पीडिता फलटणची असल्याचं सांगितलं जात असताना ही मुलगी फलटणची नाहीच असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मंगळवारी पहटेच्यावेळी स्वारगेटमधील बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय मुलीवर दत्तात्रेय गाडे नावाच्या व्यक्तीने अत्याचार केला होता.

Pune Swargate Bus Deopt  Case Update
Pune Swargate Bus Depot: अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई; स्वारगेट बस डेपोतील 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन

याप्रकरणाची दखल महिला आयोग आणि राजकीय नेत्यांनी घेतल्यानंतर पोलीस यंत्रणा कमालाची कामाला लागली आणि दोन दिवसात आरोपी दत्तात्रेय गाडे याला अटक केली. दत्तात्रेय गाडे याला त्याच्या गावातील उसाच्या शेतातून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी १३ पथकं तयार केली होती. या पथकात १०० पोसलिसांचा समावेश होता.

अत्याचाराच्या घटनेनंतर फलटण तालुक्यातील अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेधही केला होता. पीडिता स्वारगेट बस स्थानकात फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत होती. त्यावेळी दत्तात्रेय गाडे याने तिला भलवून एका शिवशाही बसमध्ये नेलं. तेथे तिच्यावर अत्याचार केले. अत्याचार घडल्यानंतर ती युवती फलटणला जाणार्‍या बसमध्ये बसून गेली होती. माध्यमांमध्ये हे वृत्त आल्यानंतर फलटण तालुक्यातील अनेकांना निषेध व्यक्त केला होता. मात्र पीडिताही फलटणची नसल्याची माहिती आता समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com