Ankush Dhavre
योगराज सिंग हे माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील आहेत.
त्यांनी देखील भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
मात्र त्यांना फारकाळ भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही.
त्यांना भारतीय संघासाठी १ कसोटी आणि ६ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली.
भारतीय संघाचा भाग असल्यामुळे त्यांना दरमहा पेंशन दिली जाते.
भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना दरम्यान ६०,००० रुपये पेंशन दिली जाते.
माध्यमातील वृत्तानुसार योगराज सिंग यांनाही इतकीच पेन्शन दिली जाते.
ते आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.