Chhaava Tax Free : छावा महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Chhava Movie Tax Free: महाराष्ट्रात छावा चित्रपट टॅक्स फ्री होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फणडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यानंतर आता विकी कौशल याचा छावा टॅक्स फ्री होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Vicky Kaushal
ChhaavaSAAM TV
Published On

Devendra Fadnavis On Chhava Movie Tax Free: विकी कौशलच्या छावा चित्रपटाने नवा विक्रम रचलाय... छावा चित्रपटाने नेमकी किती कमाई केलीय आणि कोणत्या चित्रपटाप्रमाणे छावाची घोडदौड सुरु आहे? मध्य प्रदेशमध्ये छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय, त्यानंतर महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करण्यात यावा, या मागणीने जोर धरलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छावा टॅक्स फ्री करावा, अशी मागणी केली आहे. बाहुबलीच्या वेगत छावाची कमाई सुरू आहे, आता हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार का? याकडे लक्ष लागलेय. (Will 'Chhava' Be Made Tax-Free in Maharashtra? Demand Grows After Box Office Success)

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गर्जना करतोय.. चित्रपट प्रदर्शित होऊन 6 दिवस झालेत.. मात्र आता छावाने थेट बाहुबली 2 या चित्रपटाच्या कमाईशी स्पर्धा सुरु केलीय..मात्र आतापर्यंत कोणत्या चित्रपटांनी 200 कोटींचा टप्पा पार करत रेकॉर्ड रचलाय? पाहूयात..

Vicky Kaushal
GBS News : जीबीएसमुळे आणखी दोघांचा मृत्यू, राज्यातील रूग्णसंख्या २११

'छावा'ची रेकॉर्डब्रेक झेप

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2'- 3 दिवसात 200 कोटींचा टप्पा पार

जवान, अॅनिमल, पठान- 4 दिवसात 200 कोटींची कमाई

गदर 2 आणि स्त्री 2 - 5 दिवसात 200 कोटी

बाहुबली 2 - 6 दिवसात 200 कोटी

बाहुबलीच्या वेगात विकीचा 'छावा'

बाहुबली 2 चित्रपटाने 1400 कोटींच्या कमाईचं उड्डाण घेतलं होतं... आता त्याच वेगाने छावा चित्रपट गर्जना करत झेप घेतोय.. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवणार का? याकडे लक्ष लागलंय...

Vicky Kaushal
IND vs PAK : आता भारताला दुबईत हरवा, शाहीद आफ्रिदी पुन्हा बरळला

अभिनेता विकी कौशलच्या छावाने पहिल्याच दिवशी 33 कोटींची कमाई केली होती... त्यानंतर वर्किंग डे चा छावाच्या कमाईवर कोणताच परिणाम दिसला नाही....सहाव्या दिवशीही छावाच्या कमाईची घोडदौड कायम आहे... मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी चित्रपट असल्याने छावा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात येत असतानाच.. राज्यात 2017 पासून करमणूक करच नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

Vicky Kaushal
Earthquake : रायगडमध्ये रात्री भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावपळ
"छावा' सिनेमा टॅक्स फ्री करा, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण, मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायतंय की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात, तेव्हा जो करमणूक कर असतो, तो माफ केला जातो. महाराष्टानं 2017 सालीच यासंदर्भातला निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमी‍करिता रद्द केला. आपल्याकडे करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com