Fact Check : तुम्हाला मिळणार रोज 10 हजार रुपये? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Fact Check about government scheme : तुम्हाला आता रोज 10 हजार रुपये मिळू शकतात...होय, तुम्ही ऐकलं ते आम्ही का म्हणतोय हे संपूर्ण बातमी पाहिल्यानंतर कळेल...कारण, सरकारची अशी योजना असल्याचा दावा करण्यात आलाय...मात्र, खरंच अशी कोणती योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
 bank error
bank Saam tv
Published On

केंद्र सरकारची एक योजना आलीय आणि या योजनेतून दर दिवशी 10 हजार रुपये मिळतात असा दावा करण्यात आलाय...मिळालेले पैसे काढण्यासाठी एटीएम बाहेर रांगा लागत असल्याचा दावा करण्यात आलाय...यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की नक्की ही योजना आहे तरी कोणती...? मात्र, खरंच अशी कोणती सरकारची योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींच्या नावाने केंद्र सरकारने एक योजना सुरू केलीय.या योजनेतून दररोज 10 हजार रुपये मिळवण्याची संधी आहे'.

 bank error
Kalyan : धावत्या लोकलमध्ये महिलेला मारहाण; पोलिसांनी चक्रे फिरवली, काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

रोज पैसे मिळत असल्याने लोक तातडीने पैसे काढतात...यामुळे एटीएमबाहेर लोकांच्या रांगा पाहायला मिळतात असा दावा केलाय...त्यामुळे अशी कोणती ही योजना आहे...? खरंच सरकार रोज 10 हजार रुपये देतं का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, पैसे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे...आणि रोज 10 हजार मिळणारी योजना असल्यास त्याचं सत्य सांगणं गरजेचं आहे...त्यामुळे आमच्या टीमने अशी कोणती योजना आहे याची पडताळणी केली...सरकारची स्कीम आहे का...? याबद्दल चौकशी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

 bank error
Kalyan : सप्तश्रृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर, ६ जणांचा मृत्यू, अनेकांचे संसार उद्धवस्त

व्हायरल सत्य

रोज 10 हजार मिळतात अशी कोणतीही योजना नाही

पंतप्रधान मोदींच्या नावाने योजना असल्याचा दावा खोटा

बोगस लिंक पाठवून लोकांना फसवण्याचा धंदा सुरू

योजनेसंदर्भात कोणतीही लिंक असल्यास उघडून पाहू नका

 bank error
Railway Service Issue : मुसळधार पावसाचा फटका; कोकण रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल, VIDEO

पैसे म्हटलं की अनेक जण मेसेज आवर्जून वाचतात...आणि मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे फॉलो करतात...याचाच फायदा घेत लोकांना फसवलं जातं...त्यामुळे डॉट in किंवा डॉट org असं वेबसाईटमध्ये असेल तर सावध व्हा...कारण, सरकारच्या वेबसाईटमध्ये शक्यतो डॉट GOV डॉट इन असं असतं...आमच्या पडताळणीत दररोज 10 हजार मिळतील अशी योजना असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com