Badlapur Crime : पोहायला जाणाऱ्यांवर चोरट्यांची नजर; उल्हास नदी किनारी दोन कार फोडल्या, १ लाखाचा ऐवज लंपास

Badlapur News : रविवारची सुट्टी असल्यामुळे अनेकजण उल्हास नदीवर पोहण्यासाठी जातात. त्यानुसार उल्हासनगरातील रहिवासी मयूर बनसोडे मित्रांसोबत बदलापुरातील बॅरेज धरण इथं उल्हास नदीवर पोहण्यासाठी आले होते
Badlapur Crime
Badlapur CrimeSaam tv
Published On

मयुरेश कडव 
बदलापूर
: बदलापुरातल्या उल्हास नदी किनाऱ्यावर चोरट्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. चोरट्यांनी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची चारचाकी गाडी फोडत एक लाखाचा ऐवज लंपास केला आहे. या चोरट्यांनी एकाच दिवशी दोन पर्यटकांची गाडी फोडल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

रविवारची सुट्टी असल्यामुळे अनेकजण जवळच असलेल्या उल्हास नदीवर पोहण्यासाठी जात असतात. त्यानुसार उल्हासनगरातील रहिवासी मयूर बनसोडे मित्रांसोबत बदलापुरातील बॅरेज धरण इथं उल्हास नदीवर पोहण्यासाठी आले होते. इतर पर्यटकांप्रमाणे त्यांनी आपली चारचाकी गाडी नदी किनारी रस्त्यावर लावली आणि ते पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले. यावेळी त्यांनी गाडी देखील लोक केली होती. 

Badlapur Crime
Washim Crime : मध्यरात्री दोन गटात तुफान दगडफेक, वाशिममध्ये तणाव, सहा जणांना घेतले ताब्यात

दरवाजाला तोडून लांबविला ऐवज 

मात्र हीच संधी साधत चोरट्यांनी कटावणी आणि पान्ह्याच्या साह्याने त्यांच्या कारचा दरवाजा तोडला आणि कारमधील दोन मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑडिओ सिस्टम तसंच जवळपास २७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. हे चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कारचे बरेच नुकसानही केले आहे. याप्रकरणी तक्रारदार मयूर बनसोडे यांनी बदलापूर पश्चिम पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. 

Badlapur Crime
Onion Price : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात

कार फोडल्याच्या दोन घटना 

पोलिसात तक्रार दाखल केली असता चोरट्यांना पकडण्याऐवजी तुम्ही नदीत पोहायलाच का गेलात? असा जाब विचारत पोलिसांनी आपल्यालाच गुन्हेगार ठरवण्याचा आरोप मयूर बनसोडे यांनी केला. महत्त्वाचं म्हणजे उल्हास नदी किनाऱ्यावर चारचाकी फोडून त्यातील सामान लंपास करण्याची ही कालच्या दिवसातली दुसरी घटना आहे. आंबेशिव जवळही एका पर्यटकाच्या बाबतीत असाच प्रकार घडल्याचं समोर आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com