KETAN AGRAWAL Case saam tv
मुंबई/पुणे

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट, सियाचा आणखी एक मोबाइल जप्त; कोर्टात नेमकं काय घडलं?

Siya Goyal Second Mobile Seized By Police: सिया गोयल आणि चेतन चौधरीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पोलिसांनी त्यांची पोलिस कोठडी नाकारली.

Priya More
  • सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अडचणी वाढल्या

  • दोन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

  • सियाचा दुसरा मोबाईल पोलिसांनी जप्त केला

  • पोलिसांनी ३ दिवसांची कोठडी मागितली पण कोर्टाने नाकारली

गोपाळ मोटघरे, पुणे

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सिया आणि चेतन यांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना लोणावळा पोलिसांनी आज वडगाव मावळ न्यायालयात हजर केले होते. न्यायलयाने त्यांना पोलिस कोठडी नाकारली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज न्यायालयात नेमकं काय घडलं? हे आपण पाहणार आहोत...

केतन अग्रवालची हत्या करणारे सिया आणि चेतनला आज पोलिसांनी कोर्टात हजर केले. या सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी आज न्यायालयासमोर ३ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र फिर्यादी पक्षाकडे आज कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने सिया गोयल आणि चेतन चौधरीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली, अशी माहिती सिया गोयलचे वकील विपुल दुशिंग यांनी दिली.

सियाचे वकील विपुल दूशिंग यांनी सांगितले की, सिया खूप सहकार्य करत आहे. मोबाईल ही रिकव्हर झाला आहे. मी काय लिहिलंय सांकेतिक चिन्हांची पडताळणी हे कायद्यात बसत नाही. हे संयुक्तिक नाही. तिला पोलिस कोठडी देऊ नये.' तर सरकारी वकील यांनी सांगितले की, 'सियाचा दुसरा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. डिलीट डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. सांकेतिक भाषेची पडताळणी करायची आहे. समोरासमोर चौकशी करणे महत्वाचे आहे. यासाठी पोलिस कोठडी गरजेची आहे.'

आरोपी चेतनच्या वकिलांनी सांगितले की, 'फक्त काही हाती लागतंय का? शक्यता आहे असं वाटतंय. या आधारावर पोलिस कोठडी देऊ नये.' सरकारी वकिलांनी सांगितले की, 'सांकेतिक चिन्ह आणि निक नेमचा वापर का आणि कशासाठी केलाय? हे ते दोघेचं सांगू शकतात. त्यामुळं पोलिस कोठडी हवी आहे.' यावेळी न्यायाधीशांनी सांगितले की, 'नार्को टिक टेस्टसाठी आरोपींची संमती लागेल. त्याशिवाय परवानगी मिळणार नाही. यावर सरकारी वकिलांनी ही नार्को टेस्टची गरज नसल्याचं म्हटलं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT