Shiv Sena Hearing LIVE Updates : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सर्वोच्च सुनावणी

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे, यावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आजही युक्तिवाद करणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोर्टातील प्रत्येक घडामोडीचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update :
Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update :

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरूवात, मोठी अपडेट समोर

१० व्या अनुसूचीनुसार (पक्षांतरबंदी कायदा) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी नकार दिला होता. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दाखल केलेल्या २०२४ च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात सुनावणी पुन्हा सुरू करणार आहे.

खंपीठ: सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना.

इतर याचिका: एकनाथ शिंदे गटाला अधिकृत 'शिवसेना' म्हणून मान्यता देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला आव्हान देणारी दुसरी याचिकाही आजच्या कामकाज यादीत (Listed) समाविष्ट आहे.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; असीम सरोदे यांनी मांडले कळीचे मुद्दे

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आणि आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडत आहे. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल न्यायालयात जोरदार बाजू मांडणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेबाबत घेतलेल्या निर्णयांवर, तसेच अपात्र आमदारांनी स्थापन केलेल्या सरकारच्या वैधतेवर आज न्यायालयात सविस्तर चर्चा होणार आहे.

या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी युक्तिवादातील प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकला असून, शिंदे गट आणि अध्यक्षांच्या निर्णयातील त्रुटींवर बोट ठेवले आहे.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : अध्यक्षांचे निर्णय अन् तांत्रिक अडचणी, असीम सरोदे नेमकं काय म्हणाले?

न्यायालयाने अजय चौधरी यांची गटनेतेपदी केलेली निवड योग्य ठरवली होती.

पाच न्यायमूर्तींच्या पीठाने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा निर्णय योग्य ठरवला होता, जिथे शिंदे गटाची मोठी अडचण होणार आहे.

एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवणे कायदेशीरदृष्ट्या योग्य होते; कारण शिवसेनेच्या मूळ घटनेत 'मुख्य नेते' असे कोणतेही पद अस्तित्वातच नाही.

शिवसेनेची २०१८ ची अधिकृत घटनाच कायम ठेवायला हवी. तत्कालीन राज्यपालांनी घेतलेली बहुमत चाचणी आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सर्व नेमणुका बेकायदेशीर आहेत.

सुभाष देसाई प्रकरणातील अनेक मुद्द्यांचा संदर्भ देत, आता या संपूर्ण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेच स्वतःचे अधिकार वापरून अंतिम आणि ठाम निर्णय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : भरत गोगावले यांच्या साक्षीवर प्रश्नचिन्ह:

राहुल नार्वेकर यांच्यासमोर भरत गोगावले यांनी दिलेल्या साक्षीचा संदर्भ देत सरोदे म्हणाले की, "आम्ही मित्र असल्याने गुवाहाटीला एकाच हॉटेलमध्ये राहिलो, सरकार पाडण्यासाठी गेलो नाही," असा दावा गोगावले यांनी केला होता. मात्र, त्यानंतर लगेचच भाजपसोबत स्थापन झालेले सरकार हे सर्व खोटे असल्याचे स्पष्ट करते.

Shiv Sena Hearing LIVE Updates :  कपिल सिब्बल आज कोणत्या मुद्द्यावर युक्तिवाद करणार? 

सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्ष आज सुनावणी होणार असल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिले. कपिल सिब्बल बाजू मांडतील. अपात्रता बाबत झालेल्या घडामोडी यावर चर्चा होणार आहे.अध्यक्ष यांनी घेतलेले काही निर्णय, पाच न्यायाधीश यांनी परत राहुल नार्वेकर यांनी काही निर्णय घेतले त्यावर आता सुनावणी होणार आहे. अपात्र लोकांनी सरकार चालवले आहे, असा आरोप सरोदे यांनी केला.

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सर्वोच्च सुनावणी

‘शिवसेना कोणाची?’ या ऐतिहासिक वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेना नाव-धनुष्यबाण चिन्ह आणि आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी होत आहे. या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. ठाकरेंकडून कपिल सिब्बल आजही कोर्टात युक्तिवाद करणार आहेत.

Shiv Sena Supreme Court Hearing Today Live Update : शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज रणसंग्राम, सत्तासंघर्षाच्या 'त्या' निकालावर संपूर्ण देशाचे लक्ष

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारा आणि 'शिवसेना कोणाची?' यावरून निर्माण झालेला ऐतिहासिक कायदेशीर वाद आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केले होते. या निर्णयाविरोधात आणि आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या मुद्द्यावर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणाऱ्या या सुनावणीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, या अंतिम निकालावर केवळ शिवसेनेचे भवितव्यच नाही, तर राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील दिशा ठरणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com