Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल खून प्रकरणात बीड कनेक्शन; नव्या ट्विस्टने पुण्यात खळबळ

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल खून प्रकरणात बीड कनेक्शन समोर आल्याने पुणे पोलिसांच्या तपासाला नवे वळण मिळालेय. खुनाच्या कटाची पूर्वकल्पना असलेल्या संशयित तरुणाची भूमिका तपासली जात आहे.
UntitleKetan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनसह आणखी एकाचा सहभाग? पोलिसांची संशयाची सुई नेमकी कुणाकडे?
Ketan Agarwal Killed CaseSaam TV Marathi
Published On

Beed connection in Ketan Agrawal murder case : पुण्यातील लो केतन अग्रवाल खून प्रकरणात (Ketan Agrawal Murder Case) आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. या संपूर्ण खुनाचा कट आणखी एका तरुणाला आधीपासूनच माहिती होता, असा खळबळजनक खुलासा तपासातून झाला आहे. हा नवा ट्विस्ट समोर आल्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासाला आता एक वेगळीच दिशा मिळाली असून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

खुनाच्या प्लॅनिंगची होती पूर्ण कल्पना?

मिळालेल्या माहितीनुसार, समोर आलेला हा तिसरा तरुण मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा वर्गमित्र (Classmate) आहे. केतन अग्रवाल याच्या खुनाचा कट कसा रचला गेला, याचे प्लॅनिंग काय होते, याबाबत चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया या दोघांनीही या वर्गमित्रासोबत आधीच सविस्तर चर्चा केली होती.

लोहगडावर केतनचा खून करण्यात आला, तिथे सोबत चालण्यासाठी चेतन आणि सियाने या तरुणाकडे प्रचंड आग्रह धरला होता. पण काही कारणास्तव तो तरुण १८ जून रोजी त्यांच्यासोबत लोहगडावर गेला नाही, अशी माहिती आता समोर आली आहे. जर तो तरुण त्या दिवशी सोबत गेला असता, तर या प्रकरणाला वेगळे वळण लागले असते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

UntitleKetan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनसह आणखी एकाचा सहभाग? पोलिसांची संशयाची सुई नेमकी कुणाकडे?
Ladki Bahin Yojana : जुलैची ३ तारीख उजाडली, लाडक्या बहि‍णींना जूनचे १५०० कधी मिळणार? तारीख आली समोर

खून केल्यानंतर चेतन थेट 'त्या' मित्रालाच भेटला

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि संशयास्पद मुद्दा म्हणजे, लोहगडावर केतन अग्रवाल याचा खून केल्यानंतर मुख्य आरोपी चेतन चौधरी हा सर्वात आधी याच आपल्या वर्गमित्राला जाऊन भेटला होता. त्यामुळे खुनानंतर नक्की काय घडले, आरोपींची पुढील रणनीती काय होती, याचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे या तरुणाकडे असण्याची दाट शक्यता आहे.

UntitleKetan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनसह आणखी एकाचा सहभाग? पोलिसांची संशयाची सुई नेमकी कुणाकडे?
Good News : मोठी बातमी! ७.५ कोटी नोकरदारांच्या खात्यात PF चे पैसे जमा; जाणून घ्या तुमच्या खात्यात किती जमा होणार?

काय आहे 'बीड' कनेक्शन?

पुण्यातील या हाय-प्रोफाइल मर्डर केसला बीड जिल्ह्याचे कनेक्शन जोडले गेले आहे. समोर आलेला हा संशयित तरुण मूळचा बीड (Beed) जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो पुण्यात वास्तव्यास असून, बालेवाडी येथील एका नामांकित खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आता या तरुणाला खुनाच्या कटाची आधीपासून कल्पना असूनही त्याने पोलिसांना किंवा इतरांना का कळवले नाही? आणि खुनानंतर चेतन त्यालाच का भेटायला गेला? या प्रश्नांचा शोध आता पुणे पोलीस घेत आहेत. या नव्या खुलाशामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी काही मोठ्या अटकेची शक्यता नाकारता येत नाही.

UntitleKetan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनसह आणखी एकाचा सहभाग? पोलिसांची संशयाची सुई नेमकी कुणाकडे?
Gold Price Today : सोन्याचे दर आज कमी झाले की वाढले? पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K,१८K गोल्ड रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com