केतन अगरवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयलला विविध ठिकाणी नेऊन पंचनामा केला
सिया गोयलने माध्यमांकडे पाहून अश्लील हावभाव केले
सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपणार
अक्षय बडवे, पुणे
पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याला ढकलून देत हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधातील तपास अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सिया गोयल हिला विविध ठिकाणी नेऊन पंचनामा केला. यावेळी तिचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीची आज पोलीस कोठडी संपत असून आता त्यांची कोणत्या कोठडीत रवानगी केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल यांचा मुलगा केतन अगरवालची १८ जून रोजी पुण्यातील लोहगडावरून ढकलून हत्या करण्यात आली. यामागे दुसरं तिसरं कोणीही नाही तर त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी असल्याचे उघडकीस आले. तसेच हा नियोजित कट असल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली.
घडलेल्या या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी सिया गोयल हिला पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील ‘लीलाकुंज’ येथील घरी नेले होते. याशिवाय लुल्लानगर परिसरातील फाखरी हिल्स आणि एरिया ३७ परिसरातही तिला घेऊन जाऊन पंचनामा करण्यात आला. तपासादरम्यान घटनेच्या दिवशी सियाने घातलेले कपडेही जप्त केले. दरम्यान, पुण्यातील घरातून बाहेर पडताना माध्यमांचे कॅमेरे पाहून सिया गोयलने अश्लील हावभाव केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओनंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली असून आरोपी म्हणून अटक झाल्यानंतरही तिच्या वागणुकीत पश्चात्ताप दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचा घटनापूर्वीचा व घटनानंतरचा संपूर्ण हालचालींचा मागोवा घेण्यात येत आहे. यासाठी दोघे ज्या-ज्या ठिकाणी गेले होते त्या सर्व ठिकाणांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तसेच तपासादरम्यान आणखी काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान या प्रकरणात आता कोणते नवे धागे दोरे समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.