Rain Alert : पुण्यासह रायगडला रेड अलर्ट; पुढील ७२ तास महत्त्वाचे, राज्यात पावसाची दमदार बॅटिंग

Maharashtra Weather Update Today : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट तर अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
MAHARASHTRA RAIN ALERT: RED ALERT FOR RAIGAD & PUNE, MUMBAI MAY RECEIVE 200 MM RAIN IN 24 HOURS
MAHARASHTRA RAIN ALERT: RED ALERT FOR RAIGAD & PUNE, MUMBAI MAY RECEIVE 200 MM RAIN IN 24 HOURSSaam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज

  • रायगड आणि पुणे घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट

  • उर्वरित जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट

  • मुंबईत पुढील ७२ तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

Maharashtra Weather Update Today News राज्यभरात पावसाचा जोर कायम असून पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

आज कसा असेल पाऊस? ( Today Rain Update )

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत पुढील 72 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये अवघ्या 24 तासांत 200 मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आज रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांनाही विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

MAHARASHTRA RAIN ALERT: RED ALERT FOR RAIGAD & PUNE, MUMBAI MAY RECEIVE 200 MM RAIN IN 24 HOURS
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती, बँक खात्यात ३००० रुपये जमा होणार? वाचा

वादळी पावसाची शक्यता

याशिवाय सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

MAHARASHTRA RAIN ALERT: RED ALERT FOR RAIGAD & PUNE, MUMBAI MAY RECEIVE 200 MM RAIN IN 24 HOURS
TET Exam Update : TET ची परीक्षा लांबणीवर, तारीख आली समोर; 'या' महिन्यात होण्याची शक्यता

मुंबईत कुठे कुठे पाऊस? (Mumbai Rain Update)

दरम्यान, मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पहाटेपासून शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरात पावसाचा जोर कायम आहे. काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com