

EPFO Good News on PF Interest: देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता ८.२५% व्याजदराला अंतिम मंजुरी दिली आहे. अर्थ मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता पीएफचे व्याजाचे पैसे थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे देशातील ७ कोटींहून अधिक नोकरदारांना थेट फायदा मिळणार आहे. आजपासून व्याजाची रक्कम खात्यात जमा होणार आहे. NDTV ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. (EPFO 8.25 percent interest credit latest update)
केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने मंजुरी दिल्यामुळे EPFO ने त्यांच्या नवीन डिजिटल सिस्टीमद्वारे व्याजाचे पैसे सभासदांच्या खात्यात थेट ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. देशातील ७ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांच्या खात्यात आजपासून हे पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे. सर्वांच्या पासबुकमध्ये ही रक्कम दिसायला काही दिवसांचा वेळ लागू शकतो. अधिकाऱ्यांच्या मते, सर्व पीएफ सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया पुढील १५ दिवसांत पूर्ण होईल. सर्व पीएफ खातेधारकांना ८.२५% दराने व्याज मिळेल.
सरकारने २०२५-२६ या वर्षासाठी ८.२५% दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत ज्यांच्या पीएफ खात्यात एकूण १० लाख रुपये असतील त्यांना ८.२५% दराने ८२,५०० रुपये मिळतील. ज्यांच्या पीएफ खात्यात २० लाख रुपये आहेत त्यांना व्याजापोटी १.६५ लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल. तर ज्यांच्या खात्यात ५ लाख रुपये आहेत त्यांनाही ४१,२५० रुपये मिळतील.
पीएफ खात्यावरील व्याजाची गणना मासिक चालू शिलकीच्या आधारावर केली जाते. त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच ३१ मार्च रोजी खात्यात जमा केले जाते.
तुमच्या पीएफचा बॅलन्स कसा चेक करावा?
EPFO पोर्टल: epfindia.gov.in वर जाऊन 'Member Passbook' लॉगइन करून.
UMANG ॲप: मोबाईलवरील उमंग ॲपमध्ये ईपीएफओ सेवा निवडून.
मिस्ड कॉल: नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9966044425 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन.
SMS सेवा: EPFOHO UAN MAR टाईप करून 7738299899 या नंबरवर मेसेज पाठवून (शेवटी MAR लिहिल्याने माहिती मराठीत मिळेल)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.