Ladki Bahin Yojana : कोणत्याही क्षणी लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होणार, मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Maharashtra Women Scheme: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्तासाठी ३४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता असून ईकेवायसी आवश्यक आहे.
Maharashtra Women Scheme
Ladki Bahin Yojana Updategoogle
Published On

लाडक्या बहि‍णींचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी सरकारकडून ३४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेला आहे. मे महिन्याच्या हप्तासाठी हा निधी मंजर करण्यात आला आहे. त्यामुळे लाडकीच्या खात्यात येत्या दोन दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. असं भाजप आमदार मोनिका राजाळे यांनी सांगितलं आहे. हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ठ्या सक्षम करण्याचा हेतू होता. सुरुवातीला या योजनेचा लाभ सर्व महिलांनी घेतला होता. पण या महिला अपात्र असल्याचं सरकारच्या लक्षात आलं. पुढे ईकेवायसी केल्यानंतर त्या महिलांना वगळ्यात आलं. कारण त्या या योजनेसाठी पात्र नव्हत्या.

Maharashtra Women Scheme
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन, प्रमोशन अन् सॅलरीत वाढ होणार, मोठी अपडेट समोर

आता फक्त पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा जमा केला जाणार आहे. बऱ्याच दिवसांपासून लाडक्या बहिणी हप्त्याची वाट पाहत होत्या. मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे. कारण येत्या १२ ते १५ जून दरम्यान लाडकीच्या खात्यात पैसे जमा होणार अशी माहिती देण्यात आली. ही माहिती भाजप आमदार मोनिका राजाळे यांनी सुत्रांना दिली आहे. त्यामुळे ही शक्यता वर्तवली जात आहे. पण याची अधिकृत घोषणा अद्याप आलेली नाही. ही सुत्रांनी दिलेली माहिती आहे.

तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तुमची ईकेवायसी प्रोसेस पूर्ण झालीये का हे पुन्हा एकदा तपासणं गरजेचं आहे. तसेच बँक खात्याच्या ईकेवायसी केली आहे की नाही? याची तपासणी करणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण ईकेवायसी शिवाय तुम्हाला व्यवहार करता येत नाहीत.

Maharashtra Women Scheme
Kidney Damage: किडनी 95% खराब होईपर्यंत दिसत नाहीत लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले सुरक्षित ठेवण्याचे 8 महत्त्वाचे उपाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com