Sakshi Sunil Jadhav
किडनी हा शरीरातला सर्वात महत्वाचा भाग आहे. किडनी रक्त शुद्ध करण्यासोबतच शरीरातलं पाणी, मीठ आणि खनिजे बॅलेन्स करतात. त्यामुळे किडनीचं आरोग्य संपूर्ण शरीरासाठी महत्वाचं असतं.
किडनी खराब होताना सुरुवातीला तुम्हाला कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. काही रुग्णांमध्ये ९५ ते ९९ टक्के किडनी खराब झाल्यानंतरही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत.
डायबेटीज, हाय ब्लडप्रेशर, लठ्ठपणा आणि धू्म्रपान यामुळे किडनीच्या आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे या आजारांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
स्वतःहून औषधं घेणं घातक ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषधं घेतलीत तर किडनीवर परिणाम होतो.
तुम्ही वर्षातून किमान एकदा युरिन प्रोटीन टेस्ट आणि रक्तातला क्रिएटिनिन चाचणीच्या मदतनीने तुम्ही किडनीचं नुकसान ओळखू शकता.
लघवीत प्रोटीन जाणं हे किडनी खराब होण्याचं सुरुवातीचं लक्षण मानलं जातं.त्यामुळे अशा बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
सतत थकवा, मळमळ, पाय किंवा चेहऱ्यावर सूज, भूक कमी होणं आणि श्वास घेताना त्रास होणं ही किडनीच्या आजाराची लक्षणं असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.