Sakshi Sunil Jadhav
फिटनेसचा ट्रेंड सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे सगळेच जीम आणि वर्क आउट करायला लागलेत.
पुढील माहितीत आपण वजन कमी करण्यासाठी Home Workout आणि Gym मधला बेस्ट ऑप्शन जाणून घेणार आहोत.
घरच्या घरी व्यायाम आणि जिम वर्कआउट या दोन्ही पद्धती फिटनेसाठी योग्य आहेत. पण या दोन्हीची सवय लावणं खूप गरजेचं आहे.
पुश अप्स, स्कॉट्स (Squats), प्लँक आणि योगासारखे व्यायाम घरच्या घरी करता येतात. यासाठी महागड्या उपकरणांची गरड नसते.
तुम्हाला जीममध्ये विविध प्रकारच्या मशीन, वजन उचलण्याची साधनं आणि नीट मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे हा पर्यायही सोपा आहे.
वजन कमी करण्यासाठी होम वर्कआउट आणि जिम दोन्ही प्रभावी ठरू शकतात. रोजच्या रोज व्यायामासोबत संतुलित आहार घेणं जास्त महत्वाचं आहे.
मसल्स वाढवायचे असतील तर जिममध्ये वेट ट्रेनिंग जास्त फायदेशीर ठरू शकते. त्याने स्नायूंची वाढ वेगाने होते.
तुम्ही नुकतंच फिटनेस रुटीन फॉलो करत असाल तर याची सुरुवात घरात व्यायामानेच करावी.नंतर तुम्ही जीमचा पर्याय निवडावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.