Sakshi Sunil Jadhav
माथेरान हे मुंबईपासून सुमारे ८३ किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने प्रवास केल्यावर साधारण २ ते ३ तास लागतात.
पुण्यापासून माथेरान हे अंदाजे १२० किलोमीटर अंतरावर आहे. खासगी वाहनाने तिथे ३ ते ४ तासांमध्ये पोहोचता येतं.
ट्रेनने नेरळ स्टेशनपर्यंत जाता येतं. त्यानंतर टॅक्सी, घोडा किंवा मिनी ट्रेनच्या मदतीने माथेरानला तुम्ही भेट देऊ शकता.
मुंबईहून रेल्वेने जायचं असेल तर १०० ते ३०० रुपये खर्च येतो. टॅक्सी आणि इतर वाहतुकीसह एकूण खर्च ५०० ते १००० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
माथेरानमध्ये बजेट हॉटेल्सपासून रिसॉर्टपर्यंत बरेच ऑप्शन्स आहेत. एका रात्रीसाठी जवळपास १,५०० ते ५००० रुपयांपर्यंत खर्च येतो.
पॅनोरमा पॉइंट, इको पॉइंट, चार्लोट लेक आणि लुईसा पॉइंट ही पर्यटकांची आवडती आणि प्रसिद्ध ठिकाणं आहेत.
वाहनमुक्त हिल स्टेशन असल्यामुळे माथेरान शांत आणि प्रदूषणमुक्त ठिकाण मानलं जातं. त्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत इथे निवांत वेळ घालवू शकता.
पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये तुम्ही नक्कीच माथेरानला भेट देऊ शकता. यावेळी परिसर हिरवाईने नटलेला दिसतो.
प्रवास, राहणं आणि जेवण यांचा खर्च हा जवळपास १ व्यक्तीला २,५०० ते ६,००० रुपयांपर्यंत येऊ शकतो. बजेटनुसार हा खर्च कमी किंवा जास्त होऊ शकतो.