Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातच ब्लड प्रेशरच्या समस्येला सामोरं जावं लागतं. त्यामुळे गोळ्या नियमित घ्याव्या लागतात.
बऱ्याच जणांना वाटतं की, रक्तदाबाच्या गोळ्या रोज घेतल्यावर किडनी खराब होते. याबद्दल आपण तज्ज्ञांच्या मत जाणून घेऊयात.
हाय ब्लड प्रेशरवर उपचार उपचार केले नाहीत, तर किडनीतल्या सुक्ष्म रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि किडनीचं कार्य मंदावतं.
हाय ब्लडप्रेशरमुळे किडनीचं नुकसान बरेच वर्ष जाणवत नाही. ते हळूहळू आतून होत असतं.
बिपीचं निदान झाल्यानंतर बऱ्याच तपासण्या केल्या जातात. त्यावेळी आधीपासून झालेले किडनीचं नुकसान रिपोर्टमध्ये दिसून येतं.
ब्लड प्रेशर नियंत्रणात येणं म्हणजे औषधं प्रभावीपणे काम करतायेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं थांबवू नका.
औषधांचा डोस कमी करायचा असेल किंना बंद करायचा तर तो निर्णय फक्त डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.