दरमहा 2250 रुपये मिळणार! 'या' सरकारी योजनेसाठी कोण पात्र? जाणून घ्या

Sakshi Sunil Jadhav

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

राज्यातल्या अनाथ, निराधार, निराश्रित, बेघर आणि संकटग्रस्त बालकांचं संगोपन संस्थेत न करता कुटुंबाच्या वातावरणात व्हावे, यासाठी राज्य सरकारडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन ही योजना राबवली जाते.

Krantijyoti Savitribai Phule Balsangopan Yojana

कोणाला योजनेचा मिळतो लाभ?

० ते १८ वर्षे वयोगटातल्या अनाथ, निराधार, निराश्रित, बेघर, कैद्यांची मुलं, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची मुलं, कोविडमुळे पालक गमावलेली मुलं तसेच संरक्षणाची गरज असलेली मुलं या योजनेसाठी पात्र आहेत.

Maharashtra Child Welfare Scheme

संस्थेऐवजी कुटुंबात संगोपन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या योजनेचा मुख्य उद्देश बालकांना बालगृहात ठेवण्याऐवजी नातेवाईक किंवा पर्यायी कुटुंबामध्ये सुरक्षित वातावरणात वाढण्याची संधी देणं हा आहे.

Orphan Child Financial

किती अनुदान मिळतं?

बालकांना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला २२५० रुपये आणि स्वयंसेवी संस्थेला २५० रुपये असे एकूण २५०० रुपये दिले जातात.

Child Protection Program

पैसे थेट बँक खात्यात

अनुदानाची रक्कम लाभार्थी किंवा संगोपनकर्त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

Government Support for Children

शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य

मुलांना या निधीतून शिक्षण, शालेय साहित्य, पोषण, कपडे, वैद्यकीय उपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करता येतात.

Maharashtra child welfare scheme

विशेष लाभ

एचआयव्हीग्रस्त, कॅन्सरग्रस्त, दिव्यांग, तीव्र कुपोषित, बालकामगार, रस्त्यावर राहणारे किंवा पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित बालकंही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Maharashtra child welfare scheme

आवश्यक कागदपत्रे कोणती?

आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, बँक पासबूक, शाळेचं प्रमाणपत्र आणि परिस्थितीनुसार वैद्यकीय किंवा पोलीस अहवाल सादर करणं यामध्ये महत्वाचं आहे.

Maharashtra child welfare scheme

अर्ज कुठे करायचा?

तुम्ही या योदनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातल्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात किंवा जिल्ह्यातल्या बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधू शकता.

Maharashtra child welfare scheme

NEXT: चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने मिळतात हे 8 जबरदस्त फायदे, ग्लोइंग स्कीनचं खास सिक्रेट

Anti Aging Skin Care
येथे क्लिक करा