Ketan Agarwal Case: चालण्यावरून आरोपीची ओळख पटणार? केतन अग्रवाल प्रकरणात होणार ‘गेट ॲनालिसिस'

Ketan Agarwal Killed Case: केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आरोपची ओळख पटवण्यासाठी पोलिस ‘गेट ॲनालिसिस' करणार आहेत.

पुण्याच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. आरोपी चेतन चौधरीची ओळख पटवण्यासाठी आता थेट गेट अॅनालिसिस करण्यात येणार आहे. म्हणजेच चेतनच्या चालण्याच्या विशिष्ट पद्धतीचा पोलिस अभ्यास करणार आहेत. गुन्ह्याच्यावेळी आरोपीनं चेहरा लपवण्यासाठी हुडी जॅकेट घातलं होतं. त्यामुळे आता लोहगड किल्ल्यावरील CCTV फुटेजमधील त्याची चाल आणि पोलिसांसमोर होणारी त्याची चाल यांची तांत्रिक तुलना करून तपास केला जाणार आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधील संशयिताची ओळख पटवण्यासाठी त्याच्या पावलांची लांबी, शरीराची ठेवण, हात-पायांची हालचाल आणि चालण्याची शैली यांची तुलना केली जाणार आहे. गुन्ह्याच्या दिवशी स्वतःची ओळख लपवण्यासाठी चेतन चौधरीने चेहरा झाकणारे हुडी जॅकेट परिधान केले होते. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यासाठी ही तांत्रिक प्रक्रिया आवश्यक ठरणार आहे. पोलिस आरोपीला त्याच प्रकारचे हुडी जॅकेट घालून, लोहगड किल्ल्यावर त्याच ठिकाणी आणि त्याच पद्धतीने चालण्यास सांगणार आहे. त्याचा व्हिडिओ तयार करून त्याची सीसीटीव्ही फुटेजशी तुलना केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com