Kalyan Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: कल्याणमध्ये चाललंय काय? नशेखोर तरुणांचा हैदोस, मराठी बोलता आलं नाही; परप्रांतीयांना बेदम मारहाण

Kalyan Police: कल्याणमध्ये मराठी बोलता येत नसल्यामुळे परप्रांतीय कामगारांना मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी हॉटेलची देखील तोडफोड केली. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

Priya More

Summary -

  • कल्याणच्या चक्कीनाका परिसरात नशेखोर तरुणांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण

  • मराठी नीट बोलता येत नसल्यामुळे नेपाळी कर्मचाऱ्यांवर हल्ला

  • हॉटेलमध्ये तोडफोडही करण्यात आली

  • पोलिसांनी ठोस कारवाई न केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी भाषेचा मुद्द्यावरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याणच्या चक्कीनाका परिसरात नशेखोर तरुणांनी हैदोस घातला. मराठी येत नाही म्हणून या नशेखोर तरुणांनी परप्रांतीय कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. नेपाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना ही मारहाण करण्यात आली. ही घटना चक्कीनाका येथील रिद्धी भोजनालय या हॉटेलमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री काही नशेत असलेल्या चार तरुणांनी भोजनालयात येऊन वडापावची ऑर्डर दिली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांना नीट उत्तर दिले नाही कारण त्यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नव्हते. याच कारणावरून तरुणांनी कर्मचाऱ्यांवर चीड येऊन बेदम मारहाण केली तसेच हॉटेलमध्ये तोडफोड केली.

हॉटेलचे मालक संदीप आढाव हे मराठी असून त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, आमचे कर्मचारी नेपाळी आहेत, पण ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.मराठी येत नाही म्हणून त्यांना मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे आहे. या घटनेनंतर संबंधित हॉटेल मालकाने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नशेखोर तरुणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसांनी ठोस कारवाई न केल्याने हॉटेल मालकांमध्ये नाराजी आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की, परिसरातील अशा नशेखोर आणि गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कठोर कारवाई करून चक्कीनाका परिसरात पुन्हा अशी घटना घडू नये, याची खबरदारी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire: पुण्यातील प्रसिद्ध रमेश डाईंग दुकानाला भीषण आग|VIDEO

Shocking: 'मी हारलो, माझा मृतदेह...', इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहात घेतला गळफास

Marathi Show : लहानग्यांसाठी सुरू होणार नवीन शो; 'स्टार प्रवाह'नं शेअर केला VIDEO, तारीख काय?

Goa Trip : न्यु ईअरकरिता ट्रिप प्लॅन करताय? मग गोव्यातील या हिडन ठिकाणी नक्कीच जा

...,तर मी विधिमंडळातच राजीनामा देईल, शिंदेंच्या आमदाराचे ओपन चॅलेंज|VIDEO

SCROLL FOR NEXT