Shruti Vilas Kadam
१ कप रवा, ¾ कप साखर, २ कप पाणी, ३ टेबलस्पून तूप, काही काजू, मनुका थोडंसं, केशर किंवा केशरी रंग,वेलची पावडर
कढईत थोडं तूप घालून रवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. रवा सुगंधी आणि मोकळा झाल्यावर गॅस बंद करा.
एका वेगळ्या पातेल्यात पाणी घालून त्यात केशर किंवा केशरी रंग मिसळा आणि उकळा. हे पाणी गरम असणं आवश्यक आहे.
भाजलेल्या रव्यामध्ये उकळतं केशरपाणी घाला. सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.
रवा मऊ शिजल्यानंतर त्यात साखर घाला. नीट मिसळा आणि नंतर थोडं थोडं तूप घालत राहा. हलवा चमकदार होईल.
शेवटी वेलची पावडर, भाजलेले काजू आणि मनुका घालून नीट हलवा. त्यामुळे हलव्यात अप्रतिम सुगंध आणि चव येईल.
गरम गरम रवा केशरी हलवा तुपात चमकणारा दिसेल. आवडीनुसार बदाम, पिस्ता घालून सजवा आणि नाश्त्यात किंवा प्रसादात सर्व्ह करा.