Shruti Vilas Kadam
अळशीचा मास्क केसांना लावल्यानं ते स्मूद, शायनी आणि मऊ बनतात. केसातील कोरडेपणा व फ्रिझ कमी होतो.
अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन E असतात. हे घटक टाळूला पोषण देतात आणि केसांना ओलावा राखून ठेवतात.
अळशीतील पोषक घटक केसांच्या मुळांना बळकटी देतात. यामुळे केसांची वाढ नैसर्गिकरीत्या वेगाने होते.
नियमित अळशीचा मास्क वापरल्याने केस तुटणे व गळणे कमी होते. केस मजबूत आणि दाट दिसतात.
अळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे टाळूवरील खाज, डँड्रफ आणि इतर संसर्ग कमी करतात.
अळशीतील नैसर्गिक घटक यूव्ही किरणांपासून केसांचे रक्षण करतात. त्यामुळे केस कोरडे किंवा निस्तेज होत नाहीत.
एका कप अळशीचे दाणे दोन कप पाण्यात उकळवा. जेल तयार झाल्यावर गाळून घ्या आणि केसांना लावा आणि ३० मिनिटांनी धुवा.