Shruti Vilas Kadam
पिंपल्स किंवा एक्ने झाल्यास कडूलिंब पावडर आणि मुल्तानी माती एकत्र करून पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करतो आणि त्वचा स्वच्छ, तजेलदार बनवतो.
एक चमचा दूध आणि एक चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हे त्वचेला डीप हायड्रेशन देतं आणि नैसर्गिक ग्लो आणतं.
एलोवेरा जेलमध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हे टॅनिंग कमी करतं आणि त्वचेला उजळपणा देते.
टमाटराचा रस आणि बेसन एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने डेड स्किन दूर होते आणि चेहऱ्याची रंगत निखरते.
पिकलेलं केळं कुसकरून त्यात मध मिसळा आणि चेहऱ्यावर १५ मिनिटं लावा. हे ड्राय स्किनसाठी उत्तम असून चेहरा मऊ आणि तजेलदार बनवतो.
एक चमचा दही आणि चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. हा मास्क त्वचा उजळवतो आणि संक्रमणापासून संरक्षण देतो.
नारळाच्या दुधाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. हे स्किनला पोषण देतं, मऊपणा आणतं आणि चमकदार बनवतं.