Shruti Vilas Kadam
न्यूट्रिशनिस्टनुसार केस गळण्याचं प्रमुख कारण म्हणजे शरीरात प्रोटीन, आयरन आणि व्हिटॅमिन्सची कमतरता, तसेच ताण, झोपेची कमतरता आणि चुकीचा आहार.
केसांमध्ये केराटिन नावाचं प्रोटीन असतं. त्यामुळे आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की अंडी, डाळी, दूध, आणि नट्स यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
दररोज सकाळी ही स्मूदी घेतल्यास १५-२० दिवसांत केस गळती कमी होऊ शकते. १ टेबलस्पून बदाम बटर, २ चिमूटभर अळिव (हलिम) बिया, १ टेबलस्पून भोपळ्याच्या बिया, १ टेबलस्पून काळे तिळ, १ स्कूप प्रोटीन पावडर हे सर्व घटकं मिक्सरमध्ये टाकून स्मूदी बनवा आणि नाश्त्यात प्या.
बदाम बटरमध्ये व्हिटॅमिन E आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. हे केसांना आतून पोषण देतात आणि तुटण्याची समस्या कमी करतात.
अळिव बिया (हलिम सीड्स) आयरन आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडने भरपूर असतात. त्या रक्ताभिसरण सुधारतात व केसांच्या मुळांना मजबुती देतात.
हे घटक झिंक, मॅग्नेशियम, कॉपर आणि प्रोटीनचे उत्कृष्ट स्रोत आहेत. त्यामुळे केसांची वाढ वेगाने होते आणि केसांची घनता टिकून राहते.
फक्त बाह्य उपचारांवर अवलंबून राहू नका. पुरेशी झोप, ताणमुक्त जीवनशैली आणि पौष्टिक आहार यामुळेच केस गळतीवर कायमचा उपाय होऊ शकतो.