Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Buldhana shocking incident Congress leader wife dispute : बुलढाण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांनी पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडला.
ongress leader attempts to burn wife alive in Buldhana
ongress leader attempts to burn wife alive in BuldhanaSaam TV marathi News
Published On

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

Congress leader attempts to burn wife alive in Buldhana Maharashtra : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच बुलढाणा हादरलाय. युवक काँग्रेस अध्याक्षाच्या विरोधात पत्नीने गंभीर गुन्हा नोंदवलाय. चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्षाचा पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अनैतिक संबंधाच्या संशयावरून ही घटना घडल्याचे समजतेय. चिखली पोलीसात युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. (Maharashtra domestic violence crime case 2025)

सततचा कौटुंबिक वाद व अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवरा-बायकोमधील वाद विकोपाला गेला. सततच्या भांडणातून चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्षाने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नीने समयसूचकता दाखवत पेटलेली साडी पाण्याने भिजवून जीव वाचवला.

ongress leader attempts to burn wife alive in Buldhana
Local Body Election : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ? २८८ पालिका-पंचायतींसाठी स्थानिक नेतेच ठरवणार उमेदवार

याप्रकरणी पत्नी नमिता काकडे यांनी चिखली शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेला विशाल काकडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर चिखलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकशी कऱण्यात येत आहे. नेमक्या कारणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

ongress leader attempts to burn wife alive in Buldhana
Maharashtra Weather Update : पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, धुळ्यात पारा ८.६ अंशावर; राज्यात थंडीची जोरदार एंट्री

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी विशाल आणि पत्नी नमिता यांच्यात सुरुवातीला कौटुंबिक कारणातून जोरात वाद झाला. पत्नी-पत्नी यांच्यामध्ये बाचाबाची सुरू असतानाच फोन आला. विशाल यांना एका महिलेचा फोन आला होता. पत्नीने फोन कुणाचा आला? असा जाब विचारला. त्यावर विशाल यांना राग अनावर झाला.

ongress leader attempts to burn wife alive in Buldhana
Gold Rate Today : सोन्याची किंमत पुन्हा घसरली, आठवडाभरात इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

संतापलेल्या विशाल यांनी पत्नीला बेडरूममध्ये नेले व अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. मात्र नमिताने समयसूचकता दाखवत तात्काळ पेटलेली साडी पाण्याने भिजवली व आपला जीव वाचवला. त्यानंतर पत्नीने थेट पोलिस स्टेशन गाठले अन् गुन्हा दाखल केला. चिखली पोलिसांनी याप्रकरणी विशाल यांच्यासह आणि दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ongress leader attempts to burn wife alive in Buldhana
Vande Bharat Express : सोलापूरला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, कुठून कुठे धावणार? वाचा सविस्तर माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com