Local Body Election : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ? २८८ पालिका-पंचायतींसाठी स्थानिक नेतेच ठरवणार उमेदवार

Maharashtra Local Body Elections 2025: महाराष्ट्रात २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक नेतेच उमेदवार ठरवणार असून आघाड्यांचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. मतदान २ डिसेंबरला, मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.
Local Body Election news
Maharashtra Local Body ElectionSaam Tv
Published On

Maharashtra local body election 2025 nomination process details : राज्यातील २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी आजपासून (१० नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 'स्थानिक पातळीवर निर्णयांचे अधिकार सर्वच राजकीय पक्षांनी दिल्यानं सोयीच्या आघाड्या आणि समीकरणे जोडण्याची शक्यता आहे,' त्यामुळे महायुती आणि महा विकास आघाडीसारख्या प्रमुख आघाड्यांमध्ये राज्य पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. यामुळे अनेक ठिकाणी पक्षीय चिन्हावर निवडणुका न लढवता स्थानिक आघाड्यांवर जोर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकींमध्ये २८८ अध्यक्ष आणि ६,८५९ सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होईल आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 10 ते 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी करण्यात येणार तर 21 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उमेदवारांनी अर्ज आणि शपथपत्र भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे. राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगर पंचायतीसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. (288 municipalities and nagar panchayats election schedule Maharashtra)

Local Body Election news
Vande Bharat Express : सोलापूरला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, कुठून कुठे धावणार? वाचा सविस्तर माहिती

उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ

कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगर परिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नगर परिषद, पालिका कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राजकीय पक्षांनीही निवडणुकीसाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले असून, बहुतांश पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले आहेत. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या वेळापत्रकाप्रमाणे आज सोमवारापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक असणारी कागदपत्रे संकलित केली आहेत. प्रशासनानेही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या कार्यालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सार्वजनिक आणि साप्ताहिक सुटी वगळता अन्य दिवशी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Local Body Election news
Gold Rate Today : सोन्याची किंमत पुन्हा घसरली, आठवडाभरात इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

पुणे जिल्ह्यातील १७ नगरपालिकांच्या ३९८ जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या असून,पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी 6 लाख 34 हजार 940 मतदार आहेत. या १४ नगरपरिषदांपैकी बारामती ही अ वर्ग नगरपरिषद आहे,तर लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे व फुरसुंगी- उरळी देवाची या पाच नगरपरिषदा ब वर्गामध्ये आहेत. तर क वर्गामध्ये सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरूनगर यांचा समावेश होतो. मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक यांचा समावेश नगरपंचायतींमध्ये होतो. थेट निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे.

Local Body Election news
Maharashtra Weather Update : पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, धुळ्यात पारा ८.६ अंशावर; राज्यात थंडीची जोरदार एंट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com