मुंबईतील पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये ट्रान्सजेंडरकडून तरुणीचा विनयभंग
पैसे मागताना आरोपीने तरुणीच्या खांद्याला अश्लील स्पर्श केला
जीआरपीने आरोपीला ताब्यात घेऊन एफआयआर दाखल केला
महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबईमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका ट्रान्सजेंडरने लोकल ट्रेनमध्ये २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या ट्रान्सजेंडरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. सदर घटना ही पनवेल ते सीएसएमटी लोकलमध्ये घडली आहे. या घटनेने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या दरम्यान लोकलच्या डब्यात एक ट्रान्सजेंडर व्यक्ती चढला. ही ट्रान्सजेंडर व्यक्ती प्रवाशांकडे पैसे मागत होता. या दरम्यान ट्रान्सजेंडर व्यक्तीला एका पुरुष प्रवाशाने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर तो एका कपल जवळ गेला आणि पैसे मागू लागला.
पैसे मागताना या ट्रान्सजेंडरने तरुणीच्या खांद्याला अश्लील स्पर्श केला ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. त्यांनतर ट्रेन नेरुळ स्टेशनवर येताच हे दोघेही ट्रेन मधून खाली शिवाय त्या जोडप्याने आरोपीला थांबवले आणि ड्युटीवर असलेल्या जीआरपी अधिकाऱ्याला घटनेची माहिती दिली. ट्रान्सजेंडर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून वाशी जीआरपीने आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि अधिक तपास सुरू केला आहे.
दरम्यान अशा प्रकारच्या घटना लोकलमध्ये सर्रास वाढत आहेत. ट्रान्सजेंडर व्यक्ती लोकलमधील प्रवाशांकडून नेहमीच पैसे घेताना आढळून येतात. पैसे न दिल्यास अनेकदा ते शिवीगाळ आणि जबरदस्ती देखील करतात. या घटनेने लोकलमधील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच अशा व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.